अहेरीतील खड्डे बुजवा अन्यथा वर्गणी करून खड्डे बुजवणार




नगर पंचायत अहेरी च्या मुख्याधिकाऱ्याकडे निवेदनातुन मागणी


 अहेरी ;-अहेरी नगर पंचायत हद्दीत व अहेरी शहरातील रस्त्यावर खड्डे पडले असून पावसाळ्याचे दिवस असल्याने सदर खड्डे पाण्याने भरून आहेत.खड्डयात साचलेल्या पाण्यामुळे खड्डा किती खोल असल्याचे अंदाज येत नसल्याने अहेरी शहरात नागरिकांचे व वाहनाचे वर्दड नेहमी असतो म्हणून पाणी भरलेल्या खड्ड्यामुळे अपघात होण्याचे दाट शक्यता नाकारता येत नाही म्हणून अहेरी शहरातील व प्रभागातील खड्डे बुजवा अन्यथा अहेरी शहरात वर्गणी गोळा करून सदर खड्डे बुजवण्यात येईल असे अहेरी नगर पंचायत चे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात मागणी व ईशारा दिला आहे.अहेरी शहरात व्यापार व आठवडी बाजार आणि शासकीय कामे, रुग्णालयात उपचारासाठी,विद्यार्थी शाळा, महाविद्यालयात असे विविध कामे घेऊन नागरिकांचे व वाहनाचे वर्दड नेहमी असतो.अहेरीतील रस्त्यावर खड्डे पाण्याने भरून आहेत भरलेल्या पाण्यामुळे खड्डा किती खोल आहे याचा अंदाज न आल्याने अपघात होण्याचे दाट शक्यता आहे आणि ये-जा करणाऱ्या नागरीकांना व वाहन धारकांना वाहतुकीस कमालीचे त्रास सहन करावा लागत आहे.करिता खड्डे बुजवणे आवश्यक आहे.नगर पंचायत ने या समस्येचा गंभीरता घेऊन सदर खड्डे बुजवा अन्यथा अहेरीत वर्गणी करून खड्डे बुजवणार  मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन मागणी व ईशारा देण्यात आले आहे. निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र खतवार, सचिन येरोजवार युवक मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments