गोमनी येथील पशुवैधकीय दवाखाना परिचालकाच्या भरवश्यावर डॉक्टर फक्त नाममात्र





गोमनी;-ग्रामीण भागातील पशुपालकांना त्यांच्या पशुवर वेळेच उपचाराची सोया व्हावी यासाठी शासनाने पशुवैधकीय दवाखाने सुरू केले,मात्र गोमणी येथील दवाखाना चालतो परिचालकाच्या भरवश्यावर डॉक्टर पंधरा दिवसात एकदा येतो आणि सह्या मारून जातो डॉक्टर फक्त नाममात्र ठरला आहे


गोमनी येथील पशुवैधकीय दवाखान्यात नैताम नामक डॉक्टरांची डेपुटेशन वर नियुक्ती केली आहे व आत्राम म्हणून परिचालक.

नैताम डॉक्टर हे आलापल्लीला स्थायी राहतो व आत्राम गोमणीला.परिसरात अनेक गावांत पशुपालक आहेत व ते गोमनी येथील पशुवैधकीय दवाखानाच्या भरवश्यावर अवलंबून आहेत परीचालकाचे काम नसूनही छोट्या छोट्या बिमाऱ्यावर इलाज करतो परंतु इथे डॉक्टर उपस्तीत राहत नसल्या कारणाने पशूंना मोठ्या बिमाऱ्या झाल्यास मूलचेरा किव्हा खासगी डॉक्टरांना संपर्क करावा लागतो या मुळे पशुपालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा व मानस्ताप सहन करावा लागत आहे 


विशेष म्हणजे आमच्या टीम नी २८ जून ला अटेंडेन्स बुक ची फोटो कॉपी घेतली त्या फोटो कॉपीत २४ पासून साह्य मारल्या नव्हत्या पुन्हा ५ जुलैला पाहणी केली तर जून २४ ते ५ जुलै पर्यंत डॉक्टरांनी साह्य मारल्या यावरून हे सिद्ध होते की हा नाममात्र डॉक्टर सह्या मारून पगार उचलतो व शासनाला चुना लावण्याचे काम करतो अश्या निष्क्रिय डॉक्टराला निलंबित करून घरी बसवावे अशी मागणी होत आहे

Post a Comment

0 Comments