अहेरी तालुक्यातील बोरी जि.प. शाळेत इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विदयार्थ्यांना ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाच्या सहकार्यान कारमधून ढोल ताशांच्या गजरात शाळेत आणले.
त्यावेळी सर्व विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन संजय मसराम, अकांउट ऑफिसर जि. प. गडचिरोली यांनी स्वागत केले. तसेच शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळापूर्वतयारी मेळावा क्र. २ चे आयोजन करण्यात आले. व पाठ्यपुस्तके, शुज, सॉक्स चे वितरण करण्यात आले. तसेच माध्यान्ह भोजनात मिष्ठान्न (शिरा) देण्यात आला. दुपारनंतर मजेशीर खेळ घेऊन नवीन आनंद देण्यात आला. यावेळी मा परागभाऊ ओलालवार, उपसरपंच ग्रा,प बोरी, मा. राजन्मा संगीवार, अध्यक्ष शा.व्य.स., मा.विनोदभाऊ ओलालवार इतर शा.व्य.स सदरय, ग्राम पं सदस्य उपस्तीत होते. यात मुख्याधापक कुसराम मॅडम, गोरेकर मॅडम, ठवरे मैडम,आत्राम सर, नलगुंटा सर। खेडकर सर यांनी सहकार्य केले.
0 Comments