आयएसआय पूजा खेडेकर यांच्या प्रकरणातून बनावट कागदपत्रांच्या आधारावर दिव्यांगत्व प्रमाणपत्र प्राप्त करून नोकरी बळकावण्याचा प्रकार समोर आला. त्यानुसार राज्यभर शासकीय कर्मचा-यांचे दिव्यांगत्व प्रमाणपत्र तपासणी मोहीम जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात सुरू झाली. याअंतर्गत जिल्ह्यातही सदर मोहिम सुरु करण्यात आली आहे. दिव्यांगाना नोकरीत आरक्षण मिळत असल्याचा गैरफायदा घेत जिल्ह्यातही काहींनी नोकरी बळकावल्याची शंका आहे. त्यामुळे या तपासणी मोहिमेअंतर्गत दोषी आढळणा-या कर्मचा-यांवर काय कार्यवाही होते, याकडे लक्ष लागले आहे.
जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणात दिव्यांग प्रमाणपत्रांची तपासणी प्रगतिपथावर आहे. जिल्ह्याच्या शासकीय विभागात विविध पदांवर कार्यरत असलेल्या दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची तपासणी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नियंत्रणात जिल्हा रुग्णालयात केली जात आहे. मागील शैक्षणिक सत्रात काही शिक्षकांनी बनावट दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सादर करुन बदली करून घेतली, अशी तक्रार शिक्षण विभागाला प्राप्त झाल्यानंतर बदली झालेल्या 200 शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली; परंतु या तपासणीत कोणावरही कारवाई करण्यात आली नाही. ख-या दिव्यांग व्यक्तीच्या नोकरीचा हक्क हे बोगस दिव्यांग व्यक्ती हिरावून घेत असल्याने ही तपासणी केली जात आहे. जिल्ह्यात एक हजारांच्या आसपास दिव्यांग अधिकारी व कर्मचारी आहेत. यातील सर्वाधिक दिव्यांग कर्मचारी शिक्षण विभागात आहेत. दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी अंती किती बोगस कर्मचारी आढळून येतात तसेच त्यांचेवर कोणती कार्यवाही होते, हे बघणे औत्सूक्याचे ठरणार आहे.
बॉक्ससाठी...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात अनेक शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेत बदल्या करवून घेतल्याचे प्रकरण पुढे आले होते. बनावट कागदपत्रांच्या आधारावर दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र प्राप्त करण्याचे प्रकार वाढलेले आहेत. यामुळे ख-या दिव्यांग व्यक्तीवर अन्याय होत आहे. त्यामुळे प्रमाणपत्र देतानाच योग्यप्रकारे तपासणी होणे गरजेचे आहे. ग्रामसेवक आणि महसूल विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग सुद्धा असे गैरप्रकार समोर आणू. जिल्हाधिका-यांच्या नियंत्रणात सुरु असलेली प्रमाणपत्र तपासणीअंती दोषी आढळणा-यांवर कठोर कार्यवाही करावी.
संतोष ताटीकोंडावार, सामाजिक कार्यकर्ते
0 Comments