प्रतिनिधी// अंकुश पुरी
राज्य राखीव पोलीस दल येथे निवड झालेल्या विद्यार्थी ,दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून ग्राम पंचायत येथे ध्वजारोहण चा कार्यक्रम पार पडला.
देसाईगंज //. तालुक्यातील कोरेगांव येथे आज भारताच्या ७८ स्वतंत्र दिनानिमित्त कोरेगांव येथील नवतरुण युवक जे आपार मेहनत व जिद्दीने चिकाटीने अभ्यास करून राज्य राखीव पोलीस दल येथे निवड झालेल्या युवक, दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्राम पंचायत च्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला .या प्रसंगी कोरेगांव येथील प्रथम नागरिक सौ. कुंदाताई गायकवाड सरपंच , धनंजय तिरपुडे उपसरपंच, देशमुख सर ग्रामविकास अधिकारी , जांभूळकर साहेब पोलीस अधीक्षक , सर्व ग्राम पंचायत सदस्य,तंटा मुक्त समिती अध्यक्ष व सर्व सदस्य ,गावातील नागरिक,सर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थी,किसान विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थी, अंगणवाडी सेविका व बालगोपाल बहुसंख्येने उपस्थित होते .
तसेच निवड झालेल्या विद्या्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या .
0 Comments