अविस समर्थीत नगरपंचायतीचे उपाध्यक्ष पटवर्धनसह अन्य नगरसेवकांनी टाकला राष्ट्रवादीचा दुपट्टा





राजकीय वर्तुळात खळबळ

अहेरी नगर पंचायतीला खिंडार तर विरोधकांना दे धक्का



राहुल दोंतुलवार// अहेरी तालुका प्रतिनिधी


अहेरी:- अहेरी नगर पंचायतीत आदिवासी विद्यार्थी संघटना(आवीस)ची सत्ता आहे , अर्थात अलीकडेच प्रवेश केलेले काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांची सत्ता आहे. परंतु 15 आगष्ट रोजीच्या सायंकाळी अहेरी नगर पंचायतीचे आविस समर्थित उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या अहेरीच्या राजवाड्यात स्वतःसह सहा नगर सेवकांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केल्याने राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम  यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेऊन व नगर पंचायतीत विकासात्मक कामात विस्कळलेली घडी नीट करण्यासाठी अहेरी नगर पंचायतीचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन यांनी अन्य नगर सेवकासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची  ‘घडी’ हातात बांधले.

मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुप्पटा गळ्यात टाकून जंगी स्वागत केले.

प्रवेश करणाऱ्यांमध्ये न. पं. उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, आविसचे गट नेता विलास गलबले, बांधकाम सभापती महेश बाक्केवार, महिला व बालकल्याण सभापती मीना ओंडरे,  गट नेता शिवसेना ( उबाठा) विलास सिडाम,  नगर सेविका आविस ज्योती सडमेक व अजून एक नगर सेवकाचे समावेश आहे.

येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात हे फार मोठे राजकीय घडामोडी  असल्याचे बोलले जात असून अहेरी नगर पंचायतीला खिंडार पाडून उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन व अन्य काही नगर सेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची  ‘घडी’ हातात बांधल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्ष अजून नवी उभारी घेऊन विरोधकांना ‘दे धक्का’ करून चिंतेत पाडले आहे.

Post a Comment

0 Comments