"एस.बी.महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन संपन्न"

राहुल दोंतुलवार// अहेरी तालुका प्रतिनिधी

"राष्ट्रीय एकात्मतेकरिता मानवधर्म जोपासणे गरजेचे"-प्राचार्य डॉ. विजय ए. सोमकुंवर



अहेरी- स्थानिक श्री. शंकरराव बेझलवार कला-वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य डॉ. विजय ए.सोमकुंवर यांचे शुभहस्ते गुरुवार दि. 15 ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी 7.40 वाजता 78 व्या ध्वजारोहण समारंभ पार पाडण्यात आला. ध्वजारोहण समारंभ प्रसंगी त्यांनी सर्व विद्यार्थी, एन.सी.सी.कॅडेट्स, एन.एस.एस. चे स्वयंसेवक, क्रीडा विभागातील खेळाडू, प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व समस्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या.


आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, नेताजी सुभाषचंद्र बोस व अन्य स्वातंत्र्य विरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांना अभिवादन करून व त्यांचा आदर्श ठेवून भारतातील प्रत्येक नागरिकाने राष्ट्रीय एकात्मतेकरिता मानवधर्म जोपासणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच महाविद्यालयीन विकासाकरिता प्रत्येक विद्यार्थ्यांने आपले योगदान दिले पाहिजे व देशाचे स्वातंत्र्य टिकविल्या गेले पाहिजे अशा प्रकारचा मोलाचा संदेश दिला. या प्रसंगी  एन.सी.सी. कॅडेट्स द्वारे मानवंदना देण्यात आली व नंतर परेडची पाहणी करण्यात आली.


याप्रसंगी महाविद्यालयाचे माजी प्रा.एन.एम.मोहूले, माजी प्रा. पी. तूंडूलवार, प्रा.जी.डी. जंगमवार, प्रा.पी.व्ही.घोडेस्वार, प्रा.मंगला बनसोड, डॉ.आर.डी. हजारे, प्रा.सी.एन.गौरकार, प्रा. दीपक उतरवार, प्रा.डी. एम.आवारी, प्रा.एस.आर.लांडे, डॉ. रूपा घोनमोडे,डॉ.एस.के.वाघ, डॉ.वाय.ए.काटकर, प्रा.पी.सी.जवादे, प्रा.अमोल शंभरकर, प्रा.गौरव तेलंग, प्रा.नामदेव पेंदाम, प्रा.तनवीर शेख, प्रा.अमर सहारे, श्री.सचिन कष्टी, श्री.दत्तू जाकेवार, श्री. बबन पेंदोर, श्री. प्रतीक शिंपी, श्री भारत गलबले, श्री राकेश वाघाडे एन.सी.सी. चे कॅडेट्स, एन.एस.एस.चे स्वयंसेवक, क्रिडा विभागातील खेळाडू व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता एन.सी.सी.काळजीवाहू कार्यक्रम अधिकारी प्रा.सी. एन.गौरकार , एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा.पी. व्ही.घोडेस्वार तसेच शारीरिक शिक्षण भागाच्या वतीने प्रा.जी.डी. जंगमवार यांनी प्रयत्न केले.


या कार्यक्रमाकरीता सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूरचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, सचिव श्री प्रशांत पोटदुखे, कार्यकारी अध्यक्ष आमदार किशोरभाऊ जोरगेवार व इतर पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments