सर्वसामान्य गडचिरोलीकर तरुणाने घेतला आत्मसमर्पित महिला माओवादीसोबत लग्नगाठ बांधण्याचा धाडसी निर्णय
पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या उपस्थितीत शहरातील प्रसिद्ध सेमाना हनुमान मंदीरात पारंपरिक रीतिरिवाजाप्रमाणे लग्न सोहळा पार पडला.
सविस्तर वृत्त असे आहे की, शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर जे माओवादी विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतात त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वोतोपरी मदतीचा हात पुढे करत असते. याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 16/08/2024 रोजी मागील वर्षी आत्मसमर्पित झालेली जहाल महिला माओवादी नामे रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी हिचा एलाराम येथील कैलाश मारा मडावी याचेसोबत पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या उपस्थितीत व पुढाकाराने विवाह संपन्न झाला.
सलग 14 वर्षे माओवाद्यांच्या विविध सशस्त्र माओवादी दलममध्ये कार्यरत राहून एरीया कमिटी मेंबर पदापर्यत पोहचलेली जहाल महिला माओवादी रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी, वय 28 वर्ष रा. ईरुपगुट्टा, पो. भोपालपट्टनम जि. बिजापूर (छ.ग.) हिने गडचिरोली पोलीस दलामार्फत राबविल्या जाणाया योजना व सामाजिक उपक्रमांच्या प्रभावशाली अंमलबजावणीमुळे तसेच गडचिरोली पोलीस दलाच्या तीव्र माओवादीविरोधी अभियानांमुळे व हिंसाचाराच्या जिवनाला कंटाळून मागील वर्षी दिनांक 07/10/2023 रोजी पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या समोर आत्मसमर्पण केले होते. रजनी हिच्यावर महाराष्ट्र व छत्तीसगड शासनाचे मिळून एकुण 11 लाख रुपयंाचे इनाम घोषित होते.
आत्मसमर्पण केल्यानंतर केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच आत्मसमर्पितांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामिल करुन घेण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव प्रयत्नीशिल असते. गडचिरोली जिल्ह्रातील शेती करुन सर्व सामान्य आयुष्य जगणारा तरुण कैलास मारा मडावी, वय 26 वर्षे, रा. एलाराम, पोस्ट-पेठा (देचलीपेठा), तह. अहेरी जि. गडचिरोली याने व रजनी या दोघांनी परस्पर संमतीने विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला गडचिरोली पोलीस दलाने पाठिंबा देऊन त्या दोघांचे पुढील आयुष्य सुखासमाधानाचे जाण्याकरिता आज दिनांक 16/08/2024 रोजी शहरातील प्रसिद्ध सेमाना हनुमान मंदीरात पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख व इतर वरिष्ठ अधिकारी व अंमलदार यांच्या उपस्थिती आणि पाठींब्याने पारंपरिक रीतिरिवाजाप्रमाणे विवाह समारंभ पार पाडण्यात आला. सदर विवाह सोहळ्याप्रसंगी मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी उभयतांना आशीर्वाद देऊन त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सदरचा विवाह संपन्न होण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसर्मपण शाखेचे प्रभारी अधिकारी, नरेंद्र पिवाल व अंमलदार विविध शाखांचे प्रभारी अधिकारी व अंमलदार यांनी परिश्रम घेतले.

0 Comments