शिवाजी महाराज पुतळा काही महिन्यातच कोसळला प्रकरणाची चौकशी करून आरोपीवर कारवाईची मागणी




ब्रह्मपुरी प्रतिनिधी अनिल कांबळे

आज दिनांक 12/09/2024 गुरुवार ला वंचित बहुजन महीला आघाडी तर्फे  उपविभागीय अधिकारी मा.पवर्णी पाटील मॅडम, यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन सादर केले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील राजकोट किल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आठ महिन्यानंतरच कोसळला आहे.पुतळा नेमका कशामुळे कोसळला आहे हे अद्याप अस्पष्ट आहे.रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आठ महिन्यातच कोसळल्यामुळे सगळीकडे नाराजी व्यक्त होत आहे. या झालेल्या 

प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन महीला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा लिनाताई रामटेके व संपूर्ण वंचित बहुजन महीला आघाडीच्या कार्यकर्त्यां यावेळी निवेदन देतांना लता मेश्राम, निरू खोब्रागडे,सुप्रिया तलमले, कल्पना तिवाडे जिजाऊ ब्रिगेड,अमेया पारधी,योगेशवरी दोनाडकर, स्वाती चौधरी,चंदा माटे,वंदना कांबळे,डिंपल तलमले, राणी चौधरी,मनिषा तलमले, प्रतिभा डांगे .योगिता रामटेके .व इतर कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments