आपत ग्रस्त कुटुंबीयांना मिळाले छत आझाद गणेश अमंडळ अहेरीचा अभिनव उपक्रम





अहेरी तालुका प्रतिनिधी // राहुल दोंतुलवार


 अहेरी;- येथील मुख्य मार्गावरील आजाद गणेश मंडळ मागील अनेक वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम सामाजिक सेवा करत आहे. यावर्षी मंडळांनी गरीब आणि गरजे लोकांना निवारासाठी लागणारे लोखंडी टीन पत्रे वितरित केले अतिवृष्टीमुळे ज्यांचे छत उडून गेले तसेच पाणी गळत आहेत अश्या 15 गरीब कुटुंबाच्या डोक्यावरचे छत दिले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना लाखो रुपयाची आर्थिक मदत असो की शेतीसाठी उपयोगी साहित्य असो प्रत्येक कामात. प्रत्येक कामात आझाद गणेश मंडळ पुढाकार घेत आहे स्वातंत्र्यापूर्वी या गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली होती. मात्र काही वर्षाच्या स्थगितीनंतर मागील 40 वर्षापासून आझाद गणेश मंडळ अविरत सुरू आहे. मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास वीरगोणवार.संदीप गुम्मालवार. मयूर गुम्मालवार. धनंजय मंथनवर. अक्षय येणमवार. रक्षित नरहरशेट्टीवार. मयूर चांदेकर आधी सदस्य सहकार्य करत आहे


 मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास वीरगोनवार म्हणतात मागील 40 वर्षापासून सामाजिक उपक्रमासह सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत आहे यावर्षी गरीब गरजूवंतांना टीन पत्रे वाटप केले सतत दहा दिवस अन्नदान व दूध वाटप करण्यात आले

Post a Comment

0 Comments