#khabardarmaharashtr#onlinenewsportal#education#political#social#entertainment#crime
गडचिरोली जिल्हयात दारु बंदी असतांना सुद्धा अवैद्य रित्या दारु चा सर्रास वाहतुक केल्या जावुन दारु विक्रेत्यांची संख्या वाढलेली आहे यामुळे कित्येक घरे उध्वस्त होवुन रस्त्यावर आलेली आहे तसेच युवा पिढी सुध्दा ही दारु कडे वळलेले असुन नैराश्याचे प्रमाण वाढलेले आहे अशा वाढते गुन्हेगारीचे प्रमाण बघुन दारुबंदी होणे अत्यंत गरजेचे आहे.
भामरागड पोलीस ठाणे चे पोलीस ठाणेदार दीपक डोंब यांनी हि बाब गांर्भीयाने लक्षात घेवुन श्री. अमर मोहीते उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड यांचे मार्गदर्शनाखाली भामरागड शहरात चालु असलेली दारु विक्रेते यांच्या कडक कारवाई करण्याकरिता दारुबंदी ही मोहीम राबविले असुन त्यांनी दारु विक्रेत्यांना सडो कि पडो अशी अवस्था करुन ठेवली आहे. भामरागड येथे मागील महिनाभरात पोलीस ठाणे भामरागड दारुबंदी पथकांनी दारु विक्रेत्यांवर आळा घालण्याच्या दृष्टीने भामरागड, हेमलकसा, कुमरगुडा, आरेवाडा या गावात मोहीम राबवुन धडक कारवाई करुन भामरागड पोलीस ठाणे येथे दारुचे ०८ गुन्हे दाखल करुन ११ दारु विक्रेत्यांवर कारवाई केली व एकुण १,४६,४९० /- रु.चा किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या व्यतिरिक्त उपविभाग भामरागड अंतर्गत पोस्टे मन्नेराजाराम, नारगुंडा, ताडगाव यांनी सुध्दा दारु विक्रेत्यांवर कारवाई केलेली आहे दारुबंदी मोहीम पुढे सुध्दा अशीच चालु राहणार असुन अवैद्य दारु विक्रेत्यांची माहीती मिळताच नागरिकांनी त्याबाबत पोलीसांना कळविण्याचे आवाहान भामरागड चे ठाणेदार दीपक डोंब यांनी केले आहे.
0 Comments