प्रतिनिधी// भीमराव वनकर
*उद्योगात यशस्वी वाटचाल करत समाजाच्या विकासाला प्राधान्य देणारा उद्योजक, डॉ. प्रणय खुणे
*गडचिरोली रस्ता कितीही कठीण असला खाचखळग्यानी भरलेला असला तरीही आपल्या कष्टाने त्यावर मात करणारा माणूस यशस्वी होतो. एक उद्योगी आणि यशस्वी असे व्यक्तिमत्व म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील डॉ. प्रणय खुणे. जिद्द, कष्ट आणि संयमाने सामाजिक बांधिलकी जपत डॉ खुणे सरांनी तरुणांपुढे एक आदर्श घालून दिलाय.*
*गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्रातील अती दुर्गम जिल्हा आहे. गडचिरोली म्हंटले की आपल्या डोळ्या पुढे उभे राहते ते चित्र म्हणजे; दळणवळणाची साधनं अत्यल्प. आदिवासी बहुल पट्टा. सतत होणाऱ्या नक्षली कारवायांमुळे अती संवेदनशील असा हा भाग. अश्या सतत अस्थिर वातावरणात यशस्वी व्यवसाय उभारणे अवघडच. पण डॉ. प्रणय खुणे यांनी हे शिवधनुष्य उचलले आहे. करोडोंची उलाढाल असलेली 'खुणे कन्स्ट्रक्शन कंपनी' त्यांनी स्थापन केली शिवाय सामाजिक बांधिलकी जपत गडचिरोली जिल्ह्यात व्यवसाय उद्योग वाढावेत, लोकांना रोजगार मिळावा यासाठी ते अविरत काम करतायत.*
*डॉ. प्रणय खुणे हे कुरखेडा तालुक्यातील गुरनोली गावचे रहिवासी आहेत, अतिदुर्गम भागातून आलेल्या प्रणय खुणे यांनी आपल्या करियरची सुरुवात ग्रामसचिव म्हणून केली. घरातून कामासाठी बाहेर पडताना त्यांच्या आईने त्यांना एका लोखंडी पेटी दिली होती. या पेटीत ताट, वाटी, ग्लास, एक चादर होती. या पुंजीवर त्यांचा प्रवास सुरू झाला. आज अपार कष्टाने कन्स्ट्रक्शन उद्योगात खूप मोठी भरारी घेतली व गडचिरोलीसारख्या अती दुर्गम भागात बांधकाम उद्योगांचे खुप मोठे साम्राज्य त्यांनी उभारले आहे. हा संपूर्ण प्रवास बोलका आणि खूप काही शिकवणारा आहे.*
*डॉ. प्रणय खुणे हे ग्रामसचिव म्हणून काम करताना अनेक गावांशी जोडले गेले. अतिसंवेदशील ग्रामपंचायती, गाव यांचा आपल्या २० वर्षांच्या काळात त्यांनी कायापालट केला. लोकांना मूलभूत सोईसुविधा रस्ते, पाणी मिळावे यासाठी काम केले. शासनाच्या विविध योजना अती दुर्गम भागापर्यंत पोहचवल्या. वेगवेगळी आणि मोठमोठी विकासाची काम लोकांपर्यंत नेली. वीस वर्षांचा काळ तसा पाहता खूप मोठा काळ आहे ज्यामध्ये ग्रामसचिव म्हणून काम करताना सामाजिक बांधिलकीतून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास, सुविधा पोहचवण्याचे काम ते विविध गावातून करत राहिले.पुढे सरकारी नोकरी सोडली आणि स्वतःचा 'खुणे कन्स्ट्रक्शन कंपनी' नावाने त्यांनी कन्स्ट्रक्शन व्यवसाय सुरू केला. आज गडचिरोली जिल्ह्यात जवळपास ५०० किलोमीटरचे रस्ते 'खुणे कन्स्ट्रक्शन कंपनी' ने बांधले आहेत. घनदाट जंगल, अतिसंवेदनशील नक्षली भाग अगदी माणूस पोहचू शकत नाही त्या त्या भागात रस्ते बांधणी केली आणि रस्त्याचे जाळे गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकापर्यंत खुणे यांनी पोहचवले.*
*अतिदुर्गम, अतिसंवेदनशील असला तरी गडचिरोली जिल्हा हा निसर्गसंपन्न असा जिल्हा आहे. निसर्गाने भरभरून अनेक गोष्टी इथे दिल्या आहेत.निसर्गाचा वरदहस्त असलेल्या या जिल्ह्यात निसर्गाशी जोडलेल्या अनेक उद्योग संधीना इथे वाव आहे. सगळ्यात मोठी संधी पर्यटन उद्योगाला आहे.खरतर या जिल्ह्याला पर्यटन जिल्हा घोषित करावा यासाठी त्यांनी शासनाकडे मागणी केली आहे.* *अनेक निसर्गरम्य ठिकाणे इथे आहेत जी दुर्लक्षित आहेत. ज्याचा विकास झाला पाहिजे यासाठी ते आग्रही आहेत. तर काही ठिकाणी राज्य शासनाकडून जवळपास अनेक ठिकाणांना 'क' वर्ग गटाचा दर्जा दिलेला आहे. जर या ठिकाणांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला तर अनेक रोजगारसंधी इथे निर्माण होतील. डॉ. प्रणय खुणे म्हणतात, याशिवाय इथे हजारो बचतगट इथे आहेत पण हवे तसे रोजगार इथे केले जात नाहीत त्यामुळे आम्ही त्यावरही काम करतोय. शासन छोट्या लघुउद्योगांसाठी काही मदत करू शकेल यासाठी सूचना, प्रस्ताव यावर ते काम करतायत. प्रत्येक गावात रोजगार कसा निर्माण करता येईल यावर त्यांचा भर आहे.*
*तसेच गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणत बांबू उपलब्ध आहे. बांबू संबंधित हस्तकला, खेळणी, बांबूच्या वस्तू या प्रकारचे उद्योग गडचिरोली जिल्ह्यात उभारले जाऊ शकतात.इथे बांबूसंबंधित व्यवसायांना चांगला वाव आहे पण याबाबत जागरूकता मात्र नाही. काय करावे हे लोकांना कळत नाही. मग अश्यावेळी शासनाने स्किल डेव्हलपमेंट सेंटर इथे मोठ्या प्रमाणवर सुरू करायला हवेत.* *यामुळे सुशिक्षित बेरोजगारांना अगरबत्ती उद्योग, बांबू हस्तकला असे अनेक प्रकल्प उभारता येतील. यासाठी शासन दरबारी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. डॉ खुणे सर सांगतात आम्ही आमच्या माध्यमातून स्थानिक व्यावसायिकांना प्लायवूड उद्योग सुरू करावेत यासाठी आवाहन करत आहोत.प्लायवूड उद्योगाला इथे चांगला वाव आहे.याच सोबत इथे मोठ्या प्रमाणात 'मोहा उपलब्ध आहे. मग मोहावर आधारित मोठ्या प्रमाणात उद्योग कसा उभारता येईल यासाठीही प्रयत्न चालू आहेत. खुणे सर सांगतात, राज्य शासनाकडे यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत. यासाठी आम्ही एक हेल्पलाईनसुद्धा लवकरच सुरू करतोय. जेणेकरून छोट्या उद्योगांना येणाऱ्या अडचणी, समस्या सोडवायला मदत करता येईल. कोणाला उद्योगासाठी कर्ज घेताना अडचण येते, कर्ज प्रस्ताव कसा करावा कळत नसते, प्रकल्प बनवायला मदत हवी असते तर त्यासाठी त्यांची टीम लोकांना मदत करनार आहे.*
*राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून डॉ. प्रणय खुणे काम पाहतात. याच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत ते पोहचतायत. ज्या ठिकाणी मानवाच्या अधिकाराचे हणन होते त्या ठिकाणचे प्रश्न या संघटनेमार्फत राज्यशासनासमोर ठेवले जातात. वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिट चेन्नई यांनी प्रणय खुणे यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना मानद डॉक्टरेट बहाल केलीय. याशिवाय लोकमत लोकनायक या पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलंय. क्षेत्र कोणतेही असो उद्योग, राजकीय वा सामाजिक या प्रत्येक क्षेत्रात प्रणय खुणे सरांनी आपला कर्तुत्वाचा ठसा उमटवला आहे. गडचिरोलीसारख्या साधनसंपत्ती कमी असलेल्या ठिकाणी व्यवसाय केवळ सुरू करून ते थांबले नाहीत तर स्वतःच्या उद्योगाला यशाच्या शिखरावर पोहचवले. सोबत इतरांनाही आपल्यासोबत विकासाच्या व भरभराटीच्या वाटेवर नेण्यासाठी ते प्रयत्नरत आहेत त्यामुळे डॉ. प्रणय खुणे हे खऱ्या अर्थाने आदर्श आहेत.
*याची दखल घेऊन महाराष्ट्रातील नामांकित रीसेल इन कंपनी चे संस्थापक अध्यक्ष सुधीर पथाडे यांच्या चमूने जिल्ह्यातील यशस्वी उद्योजक प्रणय भाऊ खुणे यांची बेस्ट बिजनेस पर्सनॅलिटी ऑफ द इयर म्हणून महाराष्ट्रातून निवड केले आणि मुंबई येथील अंधेरीच्या लता मंगेशकर सभागृहात दृष्यंम फिल्म अभिनेत्री श्रेया सरण यांचे हस्ते डॉ, प्रणय भाऊ खुणे यांचे भारत बिजनेस अवॉर्ड देऊन सत्कार करण्यात आले* *या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातील व्यवसाय क्षेत्रातील अनेक यशस्वी दिग्गज कंपनीचे मालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, व मुंबई येथील प्रमूख राजनेता मान्यवर यांचे उपस्थितीत सदर भारत बिझनेस अवॉर्ड प्रणय खुने यांना देण्यात आले या बद्दल खुणे कन्स्ट्रक्शन कंपनी चे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी डॉ प्रणय भाऊ खुणे यांचे अभिनंदन केले आहे ,
0 Comments