गोमणी:-येथील महालक्ष्मी बत्तकम्मा महिला मंडळ गोमणी यांचा मागील ११ वर्षांपासुन बत्तकम्मा उत्सव मोठ्या थाटामाटात रघूनाथ दासरवार यांच्या घरासमोर साजरा करण्यात येतो. यंदाही बत्तकम्मा उत्सव हा दरवर्षी प्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
दरवर्षी पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेपासून सलग ९ दिवस डिजेच्या तालावर नाच-गाण्याचा कार्यक्र असतो .गोमणी पंचक्रोषीतील भाविक मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला ९ दिवस रात्रीच्या वेळी उपस्थित राहून मोठ्या संख्येने नाच-गाण्यात सहभागी होऊन रात्रभर नाचण्याचा आनंद घेतात.
या बत्तकम्मा उत्सवात दरवर्षी शेवटच्या दिवशी बालाजी बँड पार्टी कोडीगाव -गोमणी यांचे विषेश सहकार्य असते. शेवटच्या रात्री सार्वजनिक अण्णदानाचा कार्यक्रम झाल्यानंतर रात्रभर ढोल-ताशाच्या तालावर भाविक नाचतात आणि सकाळ होताच बत्तकम्मा देवीचे गावालगत असलेल्या नाल्यात विसर्जन करण्यात येते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महालक्ष्मी बतकम्मा महिला मंडळ अहोरात्र मेहनत घेतात म्हणून याचे सर्व श्रेय या महिला मंडळालाच जातो.
0 Comments