अहेरी;-राजकिय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या अहेरी विधानसभेत निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे.
विधानसभा निवळणुकीचा प्रचार सध्या जोमात सुरू आहे,अहेरी विधानसभेत सद्या खेड्यापाड्यात गाडीने प्रचार त्या कॉर्नर सभा नेत्यांची घरोघरी भेट ती आश्वासने ती आपुलकी एक अलगच वातावरण बघायला मिळते जो जणू खेड्या पाड्यातील लोकांसाठी सनापेक्षा कमी नाही. लोकही भोडी त्यांच्या खोट्या अश्वासनावरती विश्वास,नेमकं हे ही आहे. खोट्या अश्वासनावरती विश्वास करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही याचाच फायदा घेत गेली अनेक वर्षे जनतेची या नेत्यांकडून पिडवणूक चालू आहे.
निवडणुका आल्या की खेड़ेपाडे पिंजून काढायचं आणि निवडून दिल्यावर 5 वर्ष लोकांनी नेत्या कडे जाऊन जाऊन पिंजून जायचं,मतदार आता तर जागा झाला पाहिजे, व आपला नेता ओळखला पाहिजे आता तरी सत्ता भोगल्यानां बाजूला सारून नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे. सर्वसामान्य जनतेत जाऊन त्यांच्या समस्या समजून मार्ग काढणारा समस्यांचे निराकरण करणारा नेहमी जनतेच्या मदतीला तत्पर असणारा रस्ते पाणी आरोग्य सेवा उपलब्द करून देणारा तुमच्या प्रत्येक समस्येवर रोडरोलर चालवून समस्या हल करणारा नेता हवा.
म्हणून कुठे तरी अहेरी विधानसभेच्या जनतेनी भुलथाप्याला बळी न पडता परिवर्तनाची वाट निवळावी तेंव्हाच उद्धार होईल
0 Comments