छातीला माती लावून परिवहन विभागाने सुरु केली शिवाई किती दिवस चालेल - प्रवाश्यांचा प्रश्न



आलापल्ली : राज्यात सगळीकडे इलेक्ट्रिक बस आणि शिवाई बस सुरु झाल्या. ऐटीत ह्या बस गुळगुळीत रस्त्यावर धावत आहेत. रस्त्याच्या अडचणीमुळे अहेरी उपविभागात ह्या बस पोहोचल्या नाही. मात्र गेल्या आठवड्यापासून एक शिवाई अहेरी - चंद्रपूर अशी सोडण्यात येत आहे. आनंदाची बातमी आहे. आष्टी - अहेरी हा रस्ता पूर्णपणे खराब असल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग ही बस किती दिवस सुरु ठेवेल असा प्रश्न जनतेला पडला आहे.

तूर्तास बस सुरु करणे म्हणजे छाती ला माती लावणे असा प्रकार आहे.

राज्य परिवहन महामंडळ कडून राज्यातील आणि परराज्यातील जनतेला प्रवासी सेवा उपलब्ध करून देण्यात येते. यात तिकिटाच्या दरा नुसार ही सेवा आहे. वातानुकुलीत सेवा ही महत्वाची सेवा आहे. यात आरामदायी प्रवास असतो. अश्या प्रवासाच्या बस नाजूक असतात. यामुळे रस्ते गुळगुळीत असणं आवश्यक आहे. पण सुरजागड लोह खनिज वाहतूकीने गेल्या तीन वर्षात रस्त्याचे बारा वाजले आहे. रस्ता आणि जमीन एकच झाली आहे. यामुळे शासकीय व खाजगी वाहने खराब होत आहे. एस टी आगार अहेरीची अवस्था वाईट आहे. रोज च्या 30 ते 40 बस दुरुस्ती मध्ये असतात.

अश्या स्थितीत शिवाई तर सुरु झाली. पण धावेल किती दिवस हा प्रश्न आहे.

अहेरी आगाराच्या शिवशाही बस परत गेल्या. शिवाई ची सुद्धा हीच गत होणार आहे. प्रयोग केला पण असफल होण्याची शक्यता जास्त आहे.

Post a Comment

0 Comments