सिरोंचा तालुक्यातील रामांजपूर येथे कॉर्नर सभा
सिरोंचा - अहेरी विधानसभा क्षेत्राचे आदिवासी विध्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवार पुरस्कृत अपक्ष उमेदवार यांना सिरोंचा तालुक्यातील अनेक गावामध्ये जनतेच्या प्रचंड पाठिंबा मिळताना दिसत आहे.
त्या अंतर्गत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांनी अपक्ष उमेदवर हणमंतू मडावी यांच्या प्रचारासाठी आज दिनांक 11 नोव्हेंबर 2024 रोजी सिरोंचा तालुक्यातील रामांजपूर गावातील प्रत्येक वार्डात कॉर्नर सभा घेऊन अपक्ष उमेदवार हणमंतू मडावी यांना मतदान करण्यासाठी नागरिकांना विनंती करत कॉर्नर सभा घेतले.
अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच तालुक्याचा सर्वांगीण विकास पाहिजे असेल तर सामान्य व अनुभवी हणमंतू मडावी यांना एकदा संधी देऊन भरघोष मताने विजयी कराव्या असेही नागरिकांना विनंती केले असून रामांजपूर गावातील नागरिकांनी अपक्ष उमेदवार हणमंतू मडावी यांनी पाठिंबा दर्शविले आहेत.
0 Comments