तरुणनगर येथील किडनी आजारग्रस्ताला अजय कंकडालवार व हनमंतू मडावी यांनी केली आर्थिक मदत...



विभागीय संपादक // मारोती कोलावार

गोमणीः मौजा तरुणनगर येथील रहिवासी समिर हरिपद मंडल यांची ४ वर्षापूर्वी किडनी खराब झाल्याने त्यांच्या पत्नी  सुमित्रा समिर मंडल यांनी कोणत्याही प्रकारचा विचार न करता आपल्या पतीला वाचविण्यासाठी स्वतःची एक किडनी देऊन त्यांचे प्राण  वाचविले परंतु दुर्देवाने पुन्हा ४ वर्षानंतर पत्नीने दिलेली किडनी खराब झाल्याने समिर मंडल यांच्या आईने 62 वर्षाच्या वयात आपल्या मुलाला वाचविण्यासाठी स्वताची एक किडनी देण्याचे ठरवून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नागपूर येथे जाऊन मागील आठ महिण्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. आईची किडनी दिल्यानंतर आता आईची देखील तब्बल स्वस्थ आहे परंतु काही दिवसांतच समिरची तब्बेत बिघडल्याने त्यांच्या पुन्हा तपासण्या करण्यात आल्याने त्यात स्पष्ट झाले की किडनीच्या बाजूला पाणी जमा होत आहे आणि पुढील उपचार करण्यासाठी या परिवाराकडे पैसा नसल्याने त्यांची मोठी अडचण होत असतांना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार हे हनुमंतु मडावी यांच्या प्रचारादरम्यान तरुणनगर येथे  सभा घेण्यात आली असता सदर बाब ही हनमंतू मडावी व अजय भाऊ कंकडालवार यांना माहित होताच त्यांनी या किडनीग्रस्त आजार ग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक मदत करून पुन्हा एकदा मानवतेचा धर्म जोपासल्याने सर्वत्र चर्चा होत आहे.

Post a Comment

0 Comments