आलापल्ली : राजे धर्मराव कला व वाणिज्य महाविद्यालय आलापल्ली चे प्राचार्य मारोती टिपले यांचे हृदय विकाराच्या झटक्याने नागपूर येथे निधन झाले.
तब्येत चांगली नसल्याने नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल केले होते. तेथेच त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि निधन झाले.
मारोती टिपले लोकप्रिय व्यक्तिमत्व होते. वनविभाग आलापल्ली येथे कनिष्ठ लिपिक म्हणून त्यांनी आपली कारकीर्द सुरु केली. वनविभाग आलापल्ली येथे सहकारी तत्ववार त्यांनी पतसंस्था सुरु करून कर्मचाऱ्यांचा आर्थिक प्रश्न सोडावीला. 1993 च्या पूर्वीचे एम फील असल्याने राजे धर्मराव कला व वाणिज्य महाविद्यालय मध्ये वाणिज्य शाखेत अधिव्याखता म्हणून त्यांची नियुक्ती झाली.प्राचार्य अरुण लोखंडे यांच्या निधणानंतर आतापर्यंत ते प्राचार्य पदाची धुरा सांभाळत होते.
त्यांचे मूळ गाव कोरोपना तालुक्यात भाकरी असून तेथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
0 Comments