आयुर्वेद शास्त्रासाठी प्रियंका मडावीची निवड





एटापल्ली :  कु. प्रियंका माधव मडावी हिने वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेत (नीट ) यश संपादन केले आहे. ती भगवंतराव माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली ची विद्यार्थिनी आहे.

श्रीमती विमलदेवी आयुर्वेदिक महाविद्यालय चंद्रपूर साठी तिची निवड झाली.

भगवंतराव कनिष्ठ महाविद्यालय येथील होतकरू विद्यार्थिनी म्हणून तिची ओळख होती. प्राचार्य डी. व्ही. पोटदुखे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाने तिचे अभिनंदन केले आहे. अहेरी अहेरी प्रकल्पचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी माधव मडावी यांची ती मुलगी आहे.

Post a Comment

0 Comments