निवळणुकीमध्ये वारे बदलले... अदृश्य हात करतोय हनुमंतु मडावी यांना मदत





अहेरी;-विधानसभा निवडणुकीचे मतदान आता काही तासांवर आहे. अशा परिस्थितीत अहेरी विधानसभेत राजकीय घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. वाऱ्याची दिशा अचानक बदलली आहे.


   वातावरणात कधी बदल घडेल याचा नेम लावता येतं नाही.अगदी तसेच राजकारणात कधी कोणाच्या बाजूने वारे


असतील हे सांगता येत नाही. हे वारे कधी कोणाच्या विरोधात बदलतील याचाही नेम नाही. चारही बाजूने वारे वाहिले की, केंद्रस्थानी कमी दाबाचा पट्टा तयार होतो. त्यानंतर वारे आपली दिशा बदलवितात. यांची प्रचिती सध्या अहेरी विधानसभा क्षेत्रात आली आहे. आता पर्यंत विद्यमान आमदार धर्मराव आत्राम यांच्याकडे असणारे वारे बदलले आहेत. हनुमंतु मडावी यांच्या बाजूने हे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे अचानक हनुमंतु मडावी यांचे पारडे जड झाले आहे.


मतदानासाठी अवघे काही तास राहिले आहेत. आता पर्यंत चर्चेत असलेल्या हनुमंतु मडावी यांनी अचानक प्रचारात मुसंडी मारली आहे.  सोबत कोणतेही मोठे नेते प्रचाराला नाही. अभिनेत्याचा दिखावा नाही. प्रचार साधेपणाने सुरू असताना मडावी यांना ही जादू कशी जमली? याचा शोध राजकीय जाणकार घेऊ लागले आहेत.


      मडावी यांची बाजू अचानक वर येण्यामागे राजकीय जाणकार अनेक गोष्टी कारणीभूत मानत आहेत. राजकारणातील अदृश्य शक्तीचा 'हात' मडावी यांच्यावर असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. धर्मराव आत्राम यांच्या बरोबर असलेले नेते युतीधर्मामुळे सोबत असल्याचा दिखावा करीत आहेत. 


राजकारणातील या अदृष्य शक्ती मडावी यांना मिळाली असल्याचे बोलले जात आहे.काँग्रेस व अविस कार्यकर्तेही याच 'मडावी' कडे झुकल्याचे दिसत आहेत.

Post a Comment

0 Comments