अहेरी;-अहेरी विधानसभेत या वेळी निवळणुकीत अत्यंत काट्याची टक्कर होती यावेळी रिंगणात माहायुतीकडू राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून धर्मराव बाबा आत्राम, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून भाग्यश्री आत्राम,
अपक्ष उमेदवार अमरिषराव आत्राम,अपक्ष उमेदवार हनुमंतु मडावी हे होते अहेरी विधानसभेत या निवळणुकीत चौरंगी लढत पाहायला मिळाली काही जाणकारांचे म्हणणे असे आहे की अपक्ष उमेदवार अमरिषराव आत्राम व हनुमंतु मडावी गेम चेंजर ठरू शकतात.
धर्मरावबाबा आत्राम या निवळणुकीत प्रबड दावेदार होते असले तरी त्यांनी कन्या भाग्यश्री आत्राम यांनी धर्मरावबाबा बाबा आत्राम यांच्या विरुद्ध असल्याकारणाने व महायुतीच्या प्रमुख घटक पक्ष भाजप येथील कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा धर्मरावबाबा आत्राम यांच्या पासून दुरावा मताचे विभाजन होऊन कुठे तरी झुकता माप केला आहे.
भाग्यश्री आत्राम यांना पहिल्यांदाच शरद पवार गटातर्फे उमेदवारी मिळाली असून त्याही मेन फॅक्ट ठरल्या आहेत महिला उमेदवार असल्यामुळे त्यांनाही महिलांनी आपल्या नेत्याच्या रुपात स्वीकारलं अस चित्र दिसून येते भाग्यश्री आत्राम या विधानसभेत मैदानात उतरल्या कारणाने त्यांच्या वडिलांची डोकेदुखी ठरली आहे.
अपक्ष उमेदवार अमरिषराव आत्राम हे १० वर्ष जनतेपासून विमुक्त होते या मुळे जनतेच्या संपर्कात नसल्या कारणाने काही भाग सोडलं की यांचाही दबदबा दिसत नाही.
अपक्ष उमेदवार हनुमंतु मडावी हे जरी अहेरी विधानसभेच्या निवळनुकीच्या रिंगणातला नवा चेहरा होता तरीही हनुमंतु मडावी यांना आदिवासी विद्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवार यांच्या छत्रछायेखाली असल्यामुळे आणि माजी जिल्हा परिषद अजय कंकडालवार यांचा जनसंपर्क अहेरी विधानसभेत जवळ जवळ ७० ते ८० ग्रामपंचायतीवर संपूर्ण बॉडी कुठे सदस्य तर कुठे सरपंच अश्या प्रकारे कब्जा केला आहे.
माजी जिल्हा परिषद अजय कंकडालवार यांच्या मुळे नक्कीच हनुमंतु मडावी यांचे अहेरी विधानसभेत पारडे ठरणार जड जाणकारांनी आपले मत कितीही व्यक्त केले तरीही उमेदवाराचे भवितव्य हे ईव्हीएम मशीन मध्ये बंद येत्या २३ तारखेला अहेरी विधानसभेत अपक्ष उमेदवारांचा बोलबाला होईल की अधिकृत पक्षातील उमेदवारांचा हे समजून येईल
0 Comments