विभागीय संपादक // मारोती कोलावार
अहेरी,दि.20 विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 69-अहेरी या मतदारसंघात आज शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. दुर्गम, नक्षलग्रस्त भागातील अतिसंवेदनशील मतदानकेंद्रांवरही मतदानासाठी नागरिकांची मोठ्या रांगा लागल्या होत्या. कुठल्याही मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडला नाही.
आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 69-अहेरी- 68.43 टक्के इतकी नोंदविण्यात आली आहे. अश्यातच मूलचेरा तालुक्यातील गोमनी येथे 82.37 टक्के मतदान झाले यात पुरुष 470 पैकी 395 महिला 472 पैकी 381 एकूण 942 महिला व पुरुषांनी मतदान केले
चिचेला येथे 84.21 टक्के मतदान झाले यात पुरुष 424 पैकी 368 महिला 442 पैकी 363 एकूण 866 महिला व पुरुषांनी मतदान केले.

0 Comments