अहेरी विधानसभेत यंदा जनता बदल घडविणार हनुमंतु मडावी यांना विश्वास




सध्याचे लोकप्रतिनिधी विधानसभेत कोट्यावधीचे विकास केल्याचे मोठेमोठे दावे करतात परंतु प्रत्यक्षात स्थानिक विकासाच्या आघाडीवर काहीच कृती होतांना दिसत नाही. त्यामुळे जनता आता अहेरी विधानसभा मध्ये बदल घडविणार असा विश्वास अपक्ष उमेदवार यांनी व्यक्त केलेला आहे.




अहेरी विधानसभा मतदार संघातील आवलमरी,व्येंकटापुर,लंकाचेन, चिनावट्रा,देवलमरी,काटेपल्ली येते सभा याठिकाणी आदिवासी विद्यार्थी संघटना व अजयभाऊ मित्र परिवार समर्पित उमेदवार यांनी प्रचार दौरा केला असता या प्रचार दौऱ्यात त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला हनुमंतु मडावी म्हणाले की, आपल्या भागातील नागरिकांनी आजवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक मातब्बर नेत्यांना निवडून दिले आहे. तरीदेखील अनेक मूलभूत सुविधा अद्याप अपूर्णच आहेत. 




   यंदाच्या निवडणुकीत परिवर्तन घडविण्याचे आवाहन करत मडावी म्हणाले आगामी 20 नोव्हेंबर रोजी माझ्या अनुक्रमांक 12 समोरील रोडरोलर या चिन्हावार बटण दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा. मला तुमची सेवा करण्याची संधी द्या. या प्रचार दौरा वेळी आदिवासी विद्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवारातील कार्यकर्ते इतर बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments