भाजपचा अहेरी विधानसभेत महायुतीधर्म पाडण्याचा ढोंगीपणा





अहेरी;-गेल्या जवळ जवळ अडीच वर्षापासून महाराष्ट्रात महायुतीचे सरकार चालताय या महायुतीत प्रामुख्याने भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस,(शरद पवार गट), शिवसेना (शिंदे गट) प्रमुख भूमिका आहे.


      2024 ची विधानसभा योग्य त्या रितीने जागा वाटप करून महायुतीत राहून निवळणुका लढवायच्या ठरलं,परंतु गडचिरोल्ली जिल्ह्यात महायुती धर्म पाळतांना दिसून येत नाही.


      अहेरी विधानसभेत महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाला म्हणजे धर्मराव बाबा आत्राम यांना सीट मिळाली व भाजप कडून दावा ठोकणाऱ्या अमरिषराव आत्राम यांना डावलल गेलं व अमरिषराव आत्रामांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.


      व भाजप नी अजूनही अमरिषराव आत्राम यांच्यावर्ती कोणतीच कारवाही न केल्याने व भाजप कार्यकर्ते पदाधिकारी अमरिषराव आत्राम यांना समर्थन करताना व प्रचार करतांना दिसून येत आहेत. अश्या मुळे भाजप धर्मराव बाबा आत्राम यांची वाट बिकट करण्याचे ठरवले काय आता हा प्रश्न जनसामान्यांना पळत आहे.


      भाजपचा अहेरी विधानसभेत महायुतीधर्म पाडण्याचा ढोंगीपणा करतांना दिसून येत आहे. जिथे भाजपचे उमेदवार दिले आहे तिथे मोठं मोठी मंत्री प्रचाराला येऊन राहिली गडचिरोली विधानसभा क्षेत्र असो की आरमोरी विधानसभा क्षेत्र या भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ बड्या मंत्र्यांची उपस्तिथी लाभली.


    आरमोरी विधानसभेत भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री  पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे येणार आहेत.



   महायुतीचे धर्म पालन करण्यासाठी अहेरी विधानसभेत धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रचारार्थ येतील का हा प्रश्न पडलेला आहे. 


     अश्याने भाजपची मनषा सिद्ध होते की अहेरी विधानसभेत भाजप ही दुहेरी गेम खेळण्याचे प्रयत्न करीत आहे 

अनायशा अमरिषराव आत्राम विजय होतील तर ते भाजप.मध्ये जातील म्हणजे येणाऱ्या विधानसभेत भाजपला अहेरी विधानसभेत दावा ठोकण्यात मार्ग मोकळा, व धर्मरावबाबा आत्राम विजय होतील तर महायुतीचे उमेदवार असतील व भाजप मित्रपक्षाचे असतील,


अश्या प्रकारे भाजप अहेरी विधानसभेत महायुती धर्म पाळण्याचा ढोंगीपणा करत असल्याचे चित्र दिसून पळत आहे.

Post a Comment

0 Comments