वंचित बहुजन महीला आघाडी ब्रम्हपुरी तर्फे मा.पर्वनी पाटील उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत, महामहीम, मा.राष्ट्रपती मुर्मूजी यांना निवेदन सादर





ब्रह्मपुरी प्रतिनिधी, अनिल कांबळे

ब्रम्हपुरी.परभणी शहरातील  डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील भारतीय संविधान प्रतिकृतीची जातीयवादी समाजकंटकाने तोडफोड करून विटंबना केली.ही गोष्ट अत्यंत  लाजिरवाणी आहे.संविधान रक्षक, आंबेडकरवादी आंदोलक सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी हा लाॅ चा विद्यार्थी  होता.या निष्पाप विद्यार्थ्यांला परभणी शहरातील पोलीस प्रशासनाने अत्याचार केला.पोलीस कोठडीतील अत्याचारामुळे त्याचा  मृत्यु झाला.व महीलांना अमानुषपणे मारहाण केली.याला जबाबदार असणाऱ्या पोलीसांना  निलंबित करून खुनाचा खटला दाखल करावा.सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी  व बाबा वाकोडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.व सुर्यवंशी यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नौकरी व एक कोटीची आर्थिक मदत तात्काळ  देण्यात यावी.व जखमींना पन्नास लाखापर्यंत मदत करण्यात यावी.अन्यथा वंचित बहुजन महीला आघाडी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल.

तसेच मा.केंद्रीय गृहमंत्री यांचा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमान जनक विधानाचा जाहीर निषेध करण्यात येत आहे.निवेदन देतांना वंचित बहुजन महीला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा लिनाताई रामटेके,लता मेश्राम, चंदा माटे,विद्या बागडे,वंदना कांबळे,योगिता रामटेके,साधना लोखंडे,भावना नंदागवळी,प्रतिमा डांगे,अनुपमा जनबंधु,सोनडवले,निरू खोब्रागडे,शिला निहाटे व बहुसंख्येनी महीला उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments