पेरमिली;-सार्वजनिक एकता नाट्य कला मंडळ पेरमिली संचालनालयाच्या वतीने येथील मामा तलावाच्या भव्य पटांगणावर ६ जानेवारी २०२५ रोजी सोमवारला रात्री ठीक १० वाजता "भाग्यलक्ष्मी" या तीन अंकी झाडीपट्टी नाटक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून मा. प्रमोदभाऊ आत्राम माजी. सरपंच पेरमिली , सहउदघाटक म्हणून सुनिलभाऊ सोयाम उप. सरपंच पेरमिली, दीपप्रज्वल किरणताई नैताम सरपंच पेरमिली, तर दीपक सोनुने प्रभारी अधिकारी व पोलीस स्टेशन पेरमिली यांचा अध्यक्षीय स्थान असणार असुन , प्रमुख अतिथी सुद्धा उपस्थित असणार आहेत. झाडीपट्टी नाट्य ही विदर्भातील समृद्ध अशी प्रयोगात्मक कला असून, जनसामान्यांमध्ये या कलेविषयी आत्मियता आहे. या कलेच्या माध्यमातून नागरिकांचे मनोरंजनच नव्हे, तर प्रबोधनदेखील केले जाते. तथापि, झाडीपट्टी नाट्यकलेचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्वाजनिक एकता नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष मा.सूरज शेनीगारपवार तर उपाध्यक्ष मा. साई चंदनखेडे आहेत तर रागमंचाचे मॅनेजमेंट मनीषभाऊ बाछाड , कोषाध्यक्ष पंकज येगोलपवार, रोशन येगोलपवार, पिंटू बिस्वास तर सचिवाचे काम सिद्धम मंडल व गोपाल शाहा कडे सोपवला आहे.
0 Comments