प्रतिनिधी // भीमराव वनकर
दिनांक 4 डिसेंबर 2024
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी व मुलचेरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात बांगला भाषिक गाव आहेत या गावात अनेक बांगला भाषिक नागरिक वास्तव्य करीत आहेत या समस्त गावांना केंद्र सरकारने पुनर्वसीत केले आहे, व येथील रहिवासी नागरिकांना राज्य सरकारने शेती व बंगाली माध्यमाची शिक्षण व प्रॉपर्टी कार्ड इतर व्यवस्था दिलेली आहे अनेक गावात ग्रामपंचायत आहेत परंतु या गावांमधील सर्वांगीण विकासासाठी आता राज्य सरकारने ज्याप्रमाणे इतर समाज बांधव यांचा विकसासाठी विविध योजना कार्यरत केले आहे त्याचप्रमाणे समस्त बांगला भाषिक गावांना राज्य सरकारने राज्य पुनर्वसन योजना अंतर्गत सर्वांगिण विकास करण्यासाठी विशेष पुनर्वसन विकास निधी प्याकेज द्यावे* *प्रामुख्याने या गावातील अनेक ग्रामपंचायती आजही अविकसित आहेत व विकासाची वाट बघत आहेत समस्त बंगला भाषिक गावात आमदार निधी अथवा खासदार निधी शिवाय इतर निधीचा माध्यमातून विकास काम करता येत नाही त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुका व मूलचेरा तालुका येथे राहणारे शंभर टक्के बांगला भाषिक गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा अशी मागणी,गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांचे कडे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे, जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी गोंदिया जिल्हा अध्यक्ष गुड्डू भाऊ खुणे, भंडारा जिल्हा अध्यक्ष नंदू भाऊ समरीत चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष प्रकाश भाऊ गजपुरे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा ताई मडावी ,उपाध्यक्ष मुन्ना भाऊ दहाडे व विकासपल्ली येथील बिरेण विश्वास , रेगडी येथील सुमेन विश्वास ,शामनगर येथील इंद्रजित रॉय सिमुलतला येथिल इंद्र्जित रॉय मुलचेरा येथील समीर अधिकारी व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केले आहे
0 Comments