सावधान पॉपकॉन नाही जहर खाताय फेरीवाले पॉपकॉन विकत आहेत डीटीपी प्लेट वर



अहेरी : मक्याच्या दान्यांपासून तयार होणारे पॉपकोन हा प्रत्येकाचा आवडता विषय. पॉपकोन दिसले की कुणीही घेतात आणि खातात. पॉपकोन  देण्या साठी विक्रेते कागदाचा वापर करतात. मात्र अहेरी येथे पॉपकोन विक्री करणारा पॉपकोन विक्रेता चक्क ऑफ सेट प्रिंटिंग साठी वापरात येणारी डी टी पी प्लेट वापरत असल्याचे उजेडात आले आहे. छपाई झाल्यावर फेकल्या जाणाऱ्या या प्लेट ला शाई लागलेली असतें  ही प्लेट पॉपकोन देण्यासाठी वापरत असल्याने जनतेच्या मुख्य त्वाने लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

 गावात विविध रस्त्यांवर फिरून फेरीवाले विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांची विक्री करीत असतात. अहेरीत सुद्धा अशा फेरीवाल्यांची संख्या मोठी आहे. मक्याचे कणीस, पॉपकॉर्न, गुपचूप अशा विविध वस्तूंची या फेरीवाल्यांकडून विक्री होते. अशातलाच एक फेरीवाला गेल्या काही वर्षापासून अहेरी येथे पॉपकोन विक्री करतो. पॉपकॉर्न वितरित करण्यासाठी मासिकांचा कागद वापरणे आवश्यक आहे. हा फेरीवाला मात्र मासिकांचा कागद वापरत नसून  त्याने ऑफसेट प्रिंटिंग मध्ये वापरात येणारी डीटीपी प्लेटस वापरणे सुरू केले आहे. ही डीटीपी प्लेट प्लास्टिक सारखी असते. संगणकाच्या लेझर प्रिंटर मधून बाहेर पडल्यानंतर या डीटीपी प्लेटवर हजार किंवा त्यापेक्षा जास्त कागद प्रिंट होत असतात. म्हणजेच हजार पेक्षा जास्त वर या प्लेटला शाई लागत असते. प्रिंटिंग चे काम झाल्यावर मुद्रक ही प्लेट फेकून देतो. लागलेली शाई ही विषारी तत्त्वापासून बनलेली असते. फेकण्यात आलेली विषारी तत्वापासून बनलेली असते. हीच प्लेट हा पॉपकॉर्न विक्रेता वापरत असल्यामुळे पॉपकॉर्न सोबत प्रिंटिंग प्रेस ची शाई सुद्धा जनतेच्या व मुलांच्या पोटात जात असल्याचे वास्तव समोर आले आहे.

 ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात फेरीवाले विविध वस्तूंची विक्री करीत असतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही सक्षम यंत्रणा शासनाकडे नाही. याचा गैरफायदा घेत फेरीवाले जनतेच्या जीवाशी खेळत आहेत एवढे मात्र नक्की.

Post a Comment

0 Comments