सविस्तर वृत्त असे आहे की, माओवादाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी शासन विविध योजना राबवित असते. सन 2003 पासून शासनामार्फत नक्षल गावबंदी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या अनुषंगाने गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकिच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत पुरविण्यात आलेल्या विविध शासकिय योजनांच्या लाभामुळे गेल्या काही महिन्यातच गडचिरोली जिल्हयातील एकुण 19 गावांनी माओवादंयाना गावबंदीचा ठराव एकमताने संमत केला होता. दिनांक 05/12/2024 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत पोस्टे धोडराज हद्दीतील मौजा पेनगुंडा येथे पोलीस दलामार्फत घेण्यात आलेल्या बैठकी दरम्यान गावातील नागरिकांनी एकत्रितपणे येऊन सर्वानूमते नक्षल गावबंदी करुन त्याबाबतचा ठराव प्रभारी अधिकारी पोस्टे धोडराज यांना सादर केला. तसेच मौजा मिडदापल्ली गावातील ग्रामस्थांनी याआधी यावर्षीच माओवादयांना गावबंदीचा ठराव मंजुर केला असून आज रोजी मिडदापल्लीच्या ग्रामस्थांनी रस्ते, शाळा, पुल आणि मोबाईल टॉवरच्या विकास कामांना आपला पाठिंबा दर्शवत पोलीस विभागाला सदर विकास कामांसाठी सहकार्य करण्याच्या ठरावावर एकमताने स्वाक्षरी केली. सदर बैठकी दरम्यान पोस्टे धोडराजचे प्रभारी अधिकारी यांनी ग्रामस्थांना मोबाईन टॉवर, रोड पुल या विषयीचे महत्व पटवुन दिले. तसेच माओवादयांची भीती न बाळगता त्यांच्या दमदाटीस न जुमानता आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा विचार करुन माओवादयांना कुठल्याही प्रकारची मदत न करण्याविषयी विश्वास पटवून दिला.
सदर गावे ही गडचिरोली जिल्ह्राच्या शेवटच्या टोकावर स्थित असून माओवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाया अबुझमाड परिसराच्या अगदी जवळ असल्याने या गावांमध्ये माओवाद्यांचे वर्चस्व होते. त्यामुळे जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनास त्यांच्यापर्यंत पोहचण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे येथील नागरिक हे शासनाप्रती उदासीन होते. परंतू मागील तीन वर्षामध्ये गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकिच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत विविध जनजागरण मेळावे, दिव्यांग मेळावे, कृषी सहली, कृषी मेळावे, आरोग्य मेळावे, महिला मेळावे इ. च्या माध्यमातून येथील गावकयांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचविण्यात यशस्वी झाल्याने पोलीस दलाच्या प्रती येथील गावकयांचा विश्वास दृढ झाला. माओवाद्यांकडून पोलीस खबया असल्याच्या संशयावरुन करण्यात आलेल्या निष्पाप गावकयांच्या हत्या व मारहाण, नुकसानीच्या विविध घटना, गावांच्या विकास कामात करण्यात येणारा अडथळा, जनतेला दाखविण्यात येणारा धाक इ. घटनांमुळे माओवादी हे जनतेची दिशाभूल करत आहेत हे गावकयांच्या लक्षात आले. त्याचाच परिपाक म्हणून दिनांक 05/12/2024 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत पोस्टे धोडराज हद्दीतील मौजा पेनगंुडा व मिडदापल्ली गावातील ग्रामस्थांनी बैठकी दरम्यान हा नक्षल गावबंदी व पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याबाबातचा ठराव संमत केला. तसेच यापूढे गावामार्फत माओवादी संघटनेस जेवन/राशन/पाणी देणार नाही, त्यांना कसल्याही प्रकारची मदत करण्यात येणार नाही, गावातील नागरिक स्वत: किंवा त्यांच्या मुलाबाळांना माओवादी संघटनेत सहभागी होऊन कोणत्याही प्रकारचे काम करणार नाही किंवा त्यांची ट्रेनिंग करणार नाही, माओवाद्यांच्या मिटींगला जाणार नाही तसेच माओवाद्यांना खोट¬ा प्रचारास बळी पडणार नाही असे सांगितले.
सदरची कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडण्यास उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री. अमर मोहिते व पोस्टे धोडराज येथील प्रभारी अधिकारी श्री. अमोल सुर्यवंशी यांनी महत्वाची भूमिका बजावली. सदर नक्षल गावबंदी ठराव करणाया गावातील नागरिकांचे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख व अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. श्रेणीक लोढा यांनी अभिनंदन केले असून, अबुझमाड जंगल परिसरातील इतर गावातील नागरिकांनीे माओवाद्यांच्या खोट¬ा प्रचाराला बळी न पडता स्वत:च्या व गावाच्या विकासासाठी प्रयत्नशिल राहावे. गडचिरोली पोलीस दल सदैव तुमच्या पाठीशी असून गडचिरोली जिल्ह्रास माओवादी मुक्त जिल्हा करण्यात अशाच प्रकारची मदत करावी असे आवाहन त्यांनी केले.
0 Comments