महावाडा दुर्गा मंदिर देवस्थानास पर्यटनाच्या ( क )वर्ग गटात मंजुरी द्या;डॉ,खुणे




दिनांक 5 डिसेंबर 2024 धानोरा तालुक्यातील ग्रामपंचायत गीरोला अंतर्गत अतिदुर्गम महावाडा येथे निसर्गरम्य जंगलात पहाडीच्या ठिकाणी दुर्गा मातेचे मंदिर वसलेले आहे या जंगलात शंभर वर्षांपूर्वी येथील महिला झाडू कापायसाठी आले असता त्यांना येथे दुर्गा मातेची सुबक मूर्ती येथील जंगलात मिळाली आणि ती मूर्ती येथे स्थापना करण्यात आली व गावकरी व पंचक्रोशीतील नागरिक यांच्या लोकसभागातून या ठिकाणी पहाडावर भव्य मंदिराचे बांधकाम करण्यात आले बाजूला विहरीचे सुद्धा बांधकाम करण्यात आले. दरवर्षी कार्तिकला या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते आणि धानोरा तालुक्यातील हजारो भाविक भक्त या ठिकाणी येत असतात आणि दुर्गा माताचे  दर्शन घेतात आणि या भागातील सदर मंदिर निसर्गरम्य अतिशय निसर्गरम्य जंगल भागात असल्यामुळे येथे अनेक पर्यटक येतात या मंदिरात जाण्यासाठी रस्ता नाही तसेच या ठिकाणचा कुठलाच विकास आतापर्यंत झाला नाही आणि त्यामुळे सोयी सुविधा नसल्याने आनेक पर्यटक येथे येत नाही  या मंदिर देवस्थानाचा विकास करण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ, प्रणय भाऊ खुणे यांना पाचारण करण्यात आले व गावकऱ्यांनी या मंदिराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती गावकर्यांनी केली व या दुर्गम भागात वसलेल्या भागास,राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या चमूने भेट देऊन गावकऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करून महावाडा येथील मंदिराचा सर्वांगीण विकास करण्याची मागणी केली व सांगितले राज्य शासनाने महावाडा येथील या निसर्गरम्य ठिकाणी वसलेल्या मंदिराला ( क )वर्ग पर्यटन स्थळ दर्जा द्यावा ,अशी मागणी केली यावेळी ग्रामपंचायत गिरोला येथील ग्रामसचिव सौ जांभुळकर मॅडम राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनिषा ताई मडावी , राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी ,गावातील देविदास सोनूहा ,विपिन बोटकावार , सुरेश पुढो, प्रभाकर कुमोटी मोहन मडावी व कार्यकर्ते पदाधिकारी गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments