प्रतिनिधी // भीमराव वनकर
गडचिरोली दिनांक 5 डिसेंबर 2024
तालुक्यातील मारदा येथे नवयुवक क्रीडा मंडळ यांच्या सौजन्याने भव्य प्रौढांचे ग्रामीण कबड्डी व वॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन वासुदेव नरोटे यांच्या आवारात मारदा येथे करण्यात आले या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन कार्यक्रमांचे उद्घाटक सामाजिक कार्यकर्त्या सोनलताई कोवे ,यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक ब्राह्मणकर साहेब व क्रीडा स्पर्धेचे दीपप्रज्वलन राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ, प्रणय भाऊ खुणे यांचे शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे उपाध्यक्ष चेतन कोवे ,निमगडे सर ग्रामसचिव प्रमोद आसुटकर ,कालिदास कड्यामी, प्रेमिला नरोटे, केशव कडयामी , संतोष वड्डे , सरपंच राजोली कांता ताई हलामी व पदाधिकारी उपस्थित होते उपस्थित उपस्थिताना उद्घाटक सोनल ताई कोवे, अध्यक्ष मुख्याध्यापक ब्राह्मणकर , डॉ, प्रणय भाऊ खुणे, रमेश अधिकारी, यांनी मार्गदर्शन केले यावेळी डॉ, प्रणय भाऊ खुणे यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात सांगितले ग्रामीण भागातील कला व क्रीडास वाव मिळाला पाहिजे याकरिता प्रत्येक गाव खेड्यात ,कला क्रीडा स्पर्धेचे आयोजन काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटिका सामाजिक कार्यकर्त्या सोनलताई कोवे, अध्यक्ष ब्राह्मणकर सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले , यावेळी देवापूर येथील आयपीएल क्रिकेट सराव करणारे खेळाडू मास्टर सुरज पोटावी व राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू नरोटे कुटुंबीय यांचा मारदा येथील ग्राम संघाच्या वतीने सत्कार करून आर्थिक मदत करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन येथील ग्रामसभा अध्यक्ष शिवाजी भाऊ नरोटे यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात करून महापुरुषाच्या फोटोला माल्याअर्पण करून व आदिवासी गोंडी धर्म ध्वजारोहन करून झाले व मान्यवरांच्या हस्ते व्हॉलीबॉल व कबड्डी स्पर्धेचे भव्य उद्घाटन करण्यात आले यावेळी गावातील महिला बचत गट, महिला ग्राम संघ व पुरुष ग्राम संघ पदाधिकारी कार्यकर्ते तथा या भागातील कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धेची खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी नवयुवक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ नरोटे उपाध्यक्ष प्रशांत नरोटे सचिव युवराज कड्यामि कोषाध्यक्ष प्रकाश नरोटे,क्रीडा प्रमुख माणिक कड्यामी ,करन पदा, नितेश कडयामी, साईनाथ कडयामी, क्रीडा प्रमुख, वैभव नरोटे ,प्रशांत नरोटे रमेश नरोटे ,यांनी अथक प्रयत्न केले
0 Comments