अहेरी : आज सकाळी 7.29 वाजता दरम्यान अहेरी हादरली. भूकंपचा धक्का अहेरी व परिसरातील नागरिकांनी अनुभवला.
सकाळी 7.29 वाजता काही जण झोपून होते तर बरीच मंडळी उठली होती. आणि आपापल्या कामात लागली होती.
जनता आपल्या कामात असताना अचानक जमीन हलयाला लागली. जमिनीतून कंपन ऐकू येऊ लागले. पंखे हलत होते. खिडक्याची तावदाने वाजायला लागली.
भूकंपच्या भीतीने लोक घरातून बाहेर यायला लागली आणि एकमेकांना विचारायला लागली.
याचा अनुभव सगळ्यांनी घेतल्याने भूकंपावर शिक्कामोर्तब झाले.
0 Comments