मुद्दा दारूबंदीचा फरमान गॅस डिझल पेट्रोल बंदीचा पोलीस प्रशाशनाचे चाललंय तरी काय




कमलापूर;-कमलापूर परिसरात मागील काही वर्षापासून अवैध दारू विक्री जोमाने सुरू आहे.त्यामुळे येथील तरुण पिढी दारूच्या आहारी जात आहे.दारूच्या व्यसनामुळे अनेकांचे संसार देखील उध्वस्त झाले आहे.येथील महिलांनी पुढाकार घेऊन दारूबंदी साठी अनेकदा पोलीस प्रशासनाला निवेदन देऊनही दारू बंदी होत नसल्याने येथील युवा पिढीने आता पुढाकार घेतला आहे.मात्र,पोलीस प्रशासन दारूबंदी न करता येथील व्यवसायिकांचे पेट्रोल,डिझेल,गॅस आणि खर्रा बंद करण्याचा तोंडी फर्मान काढून दबावतंत्राचा वापर करत आहे.


कमलापूर परिसरातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन अनेकदा प्रयत्न करूनही बरुबंदी होत नसल्याने नुकतेच कमलापूर येथील काही महिलांनी आणि युवकांनी जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती महाराष्ट्र गडचिरोली जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांना निवेदन देऊन गावातील अवैध दारूबंदीसाठी पुढाकार घेण्याची विनंती केली.


त्याअनुषंगाने नुकतेच काही दिवसांपूर्वी विविध वृत्तपत्रात या निवेदनाचे बातम्या सुद्धा झळकले.त्यांनतर वरिष्ठांनी एका स्थानिक अधिकाऱ्याची चांगलीच कानउघाडणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.त्यानंतर मात्र,त्या अधिकाऱ्याने गावातील अवैध दारू बंदी न करता उलट आपल्या पदाचा वापर करून गावात दारूबंदी साठी पुढाकार घेणाऱ्या युवकांवर दबावतंत्र वापरून टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.एवढेच नव्हेतर पेट्रोल,डिझेल,गॅस आणि गुटखा देखील बंद करण्याचा तोंडी फर्मान काढला आहे.अहेरी ते सिरोंचा रस्त्यावर पेट्रोल पम्प नसल्याने या रस्त्यावरील विविध गांवांत पेट्रोल,डिझेल आणि गॅस विक्री करतात.त्यामुळे गोरगरिबांना गावातच या सर्व जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होतात.मागील अनेक वर्षापासून बरेच गावात छोटे-मोठे किराणा दुकानदार आणि पान टपरी वाले हा व्यवसाय करीत आहेत.


मात्र,महिला आणि युवकांनी दारूबंदी करण्याची मागणी केल्यावरच गॅस, डिझेल,पेट्रोल आणि खर्रा विक्रीकर बंदी का ? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे.त्यामुळे येथील अवैध दारू कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे ? असा देखील प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.कमलापूर हे गाव काही वर्षापूर्वी नक्षल्यांचा माहेरघर म्हणून ओळखले जायचे.एक प्रकारे नक्षल्यांचा राज असायचा.त्यामुळेच याठिकाणी कुठल्याही विभागाचे अधिकारी सेवा देण्यासाठी यायला घाबरायचे.सध्या नक्षल्यांची दहशत नसलीतरी याठिकाणी एका विभागातील अधिकाऱ्याची हुकूमशाही सुरू झाल्याने गावातील नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत.


गावकरी ठोठावणार वरिष्ठांचे दार

गावातील दारू बंदी न करता गावकऱ्यांना दबावात आणून व्यापाऱ्यांचे रोजगार हिरावणाऱ्या अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्यासाठी गावातील महिला आणि तरुण पिढी मोठ्या संख्येने जिल्हा मुख्यालय गाठणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.त्यामुळे कमलापूर परिसरातील अवैध दारूबंदीचा विषय वरिष्ठांच्या कोर्टात जाणार आहे.

Post a Comment

0 Comments