कोडीगाव टोला येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन जल्लोषात साजरी




विभागीय संपादक//मारोती कोलावार

 गोमणी:कोडीगाव टोला येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात व जल्लोषात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन साजरी करण्यात आली.

    या कार्यक्रमाला कोडीगाव, कोडीगाव टोला,गोमणी, भिमनगर, चिचेला व नवेगाव येथील माळी समाज व इतर समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश शेंडे सेवानिवृत्त मुख्याध्याक गोमणी, कार्यक्रमाचे उद्घाटक शंकर वंगावार माजी सरपंच ग्रा.पं.गोमणी, सहउद्घाटक मंगरु आलाम पो. पा. कोडीगाव तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राकेश झाडे जि.प. शिक्षक मुखडी, मारोती कोलावार विभागीय संपादक खबरदार महाराष्ट्र न्युज नेटवर्क तथा एकल विद्यालय सुंदरनगर संच समिती अध्यक्ष, उमेश कडते सरपंच आंबटपल्ली, अक्षय गोंगले, राकेश सडमेक ग्रा.को.स. अध्यक्ष चिचेला, शुभम शेंडे ग्रा.पं.स. गोमणी, सिद्धार्थ दुर्गे, तुकाराम मडावी, यशवंत मोहुर्ले, नामदेव शेंडे, किशोर दुर्गे, किशोर येलमुलवार हे उपस्थित होते. 

 कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता माळी समाज मंडळ गोमणी- कोडीगाव टोला अध्यक्ष राजेश्वर शेंडे, उपाध्यक्ष विजय निकेसर तसेच आयोजक श्रीनिवास शेंडे, आकाश निकेसर, यशवंत मोहुर्ले, मधुकर निकेसर व मंडळाचे सर्व सदस्यांनी सहकार्य केले. या कार्यकमाचे संचालनाची जबाबदारीशुभम शेंडे व रविंद्र गाऊत्रे घोट / नवेगाव यांनी पार पाडले. कार्यक्रमाची सांगता लहान चिमुकल्या मुलींच्या नृत्याने करण्यात आली.

 या कार्यक्रमात मारोती कोलावार, शेंडे सर, किशोर येलमुलवार आणी उमेश कडते यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments