चामोर्शी;-नवोदय विद्यालय प्रवेश पुर्व परीक्षा दिनांक १८ जानेवारी रोजी गडचिरोली जिल्हयात अनेक केंद्रावर संपन्न झाली. त्यात चामोर्शीतील एक प्राचार्य विद्यार्थीनीचे विसरलेले हॉल तिकीट घेऊन थेट परीक्षा केंद्रावर पोहचुन ते विद्यार्थीनीला सुपुर्द केले.दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी नवोदय विद्यालय प्रवेश पुर्व परीक्षा चामोर्शी तालुक्यातील अनेक केंद्रापैकी जि.प.म.गांधी हायस्कुल घोट या ठिकाण सुद्धा आयोजित होती.या परीक्षा केंद्रावर जि.प.उच्च प्राथमिक कन्या शाळा कुनघाडा (रै) चे काही विद्यार्थी प्रविष्ठ होणार होते.त्यातीलच कु.दिवीजा राजेश वासेकर ही विद्यार्थीनी आपल्या शिक्षक व मैत्रीनींसह घोट येथील परीक्षा केंद्रावर जाण्यास निघाली.परंतु चामोर्शी येथील एका दुकानात तिचे परीक्षेचे हॉल तिकीटसह सर्व वस्तु विसरल्याचे दुकानदाराच्या लक्षात आले.त्याच वेळी चामोर्शी येथील यशोधरा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य शाम रामटेके त्या दुकानात गेले. तेव्हा ही बाब दुकानदाराने त्यांच्या निदर्शनास आणुन दिली. त्यावेळी पेपर सुरु व्हायला केवळ एक तास शिल्लक होता. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता प्राचार्य शाम रामटेके यांनी कुनघाडाच्या केंद्र प्रमुखांशी फोनवर संपर्क करून माहिती दिली आणि विद्यार्थ्यासोबत असलेल्या शिक्षकांना संपर्क साधण्यास सांगुन थेट घोटचे परीक्षा केंद्र गाठले आणि संबंधित शिक्षकाशी संपर्क करून विद्यार्थीनीचे हॉल तिकीटसह परीक्षेचे सर्व साहित्य त्यांच्या सुपुर्द केले.तेंव्हा केंद्रावर उपस्थित अनेकांनी त्यांच्या या कार्याचे कौतुक केले.यातुन शिक्षकात अजुनही माणुस जीवंत असल्याचे पुन्हा एक सिद्ध झाले .
0 Comments