अहेरी : विधानसभा आटोपल्या. राज्यात एक हाती भाजपला सत्ता मिळाली.भाजपला एक हाती सत्ता मिळाली असली तरी यात तीन पक्ष हिस्सेदार आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांचा यात समावेश आहे. विधानसभेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाली असल्याने रखडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या हालचाली भाजपने वरिष्ठ पातळीवरून सुरू केल्या असल्याचे बोलले जात आहे. यातूनच स्थानिक परिसरात जिल्हा परिषद निवडणुकीची चर्चा सुरू झालेली आहे.अहेरी विधानसभा मतदारसंघ विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने कायम ठेवला.येथून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे धर्मराव बाबा आत्राम निवडून आले. निवडून आल्यानंतर पुन्हा एकदा नव्या जोमाने त्यांनी आपला जनसंपर्क सुरू ठेवला आहे. अंबरीशराव आत्राम यांचे नाव पहिल्या क्रमांकावर येते. अमरीश्राव आत्राम तूर्तास भाजपमध्ये आहेत की नाही हा संभ्रम स्थानिकांमध्ये निर्माण झाला आहे. पक्षाची अधिकृत उमेदवारी न मिळाल्यामुळे बंड पुकारून त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. पराभव झाला. विधानसभा निवडणुकीदरम्यान बंड पुकारणाऱ्या उमेदवारावर भारतीय जनता पक्षाने कारवाई केली. यातून पद्धतशीरपणे अमरीश राव आत्राम यांना वगळण्यात आले. यामुळे ते भारतीय जनता पक्षातच आहेत असाही एक सूर स्थानिक नागरिकांमध्ये निघत आहे. असे असले तरी गेल्या एक महिन्यापासून ते अहेरीत नसल्याने जिल्हा परिषदेच्या निवडणूक यांचे नियोजन कसे करायचे असा प्रश्न भारतीय जनता पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांपुढे निर्माण झाला आहे. प्रतिस्पर्धी धर्मराव बाबा आत्राम यांनी निवडणूक जिंकली आणि ते कामालाही लागले तर दुसरीकडे अमरीश राव आत्राम मतदार संघात अनुपस्थित असल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या इच्छुक उमेदवारांपुढे पेच निर्माण झाला आहे.
नोव्हेंबर महिन्यात संपन्न झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राज्य पातळीवर दोन आघाड्या तयार झाल्या. कोणत्या परिस्थितीत सत्ता हस्तगत करायची असल्याने पूर्णपणे मैत्रीपूर्ण लढत टाळल्या गेली. यात अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला. स्थानिक मतदारसंघात अशीच परिस्थिती अमरीश राव अत्राम यांच्या वाट्याला आली. तिकीट मिळवण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत एकाकी किल्ला लढवला. पण भाजपची अजित पवार गटाशी युती असल्याने व विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम प्रबळ दावेदार असल्याने महायुतीने धर्मराव बाबा यांना टिकीट जाहीर केली.शेवटी अमरीशराव आत्राम यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागली.असे असले तरी अमरीश राव आत्राम हे भाजप पुरस्कृत उमेदवार होते अशी चर्चा अहेरी विधानसभा मतदारसंघात सर्वत्र आहे. निवडणूक झाली.निकाल लागला.अहेरी मतदारसंघातील जनतेने पुन्हा एकदा धर्मराव बाबा आत्राम यांच्या बाजूने आपला कौल दिला.
मोठ्या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद बाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. अनेक इच्छुकांचे नाव आता चर्चेत यायला लागलेली आहेत. इच्छुक आपल्या नावांची चर्चा जनतेत करत आहेत. काहींनी तर तयारीला सुरुवात केली आहे. जनसंपर्क वाढवायला सुरुवात झाली आहे. या सगळ्या दृष्टिकोनाने धर्मराव बाबा आत्राम यांनी आपल्या दौऱ्याला सुद्धा वेग दिला आहे. मागील पंधरवड्यापासून ते आपल्या मतदारसंघात प्रचंड दौरे करत आहेत. या दौऱ्याने जिल्हा परिषद ची चर्चा पुन्हा एकदा जोरदार आहे.
तर दुसरीकडे मात्र भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषद च्या निवडणुकी बाबत सगळे काही आलबेल दिसत आहे. अहिरी विधानसभा मतदार संघात भाजप कोणाच्या नेतृत्वात जिल्हा परिषद निवडणुका लढवेल हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. भारतीय जनता पक्षाने अधिकृतपणे ही जबाबदारी अमरीश राव आत्राम यांच्या खांद्यावर टाकलेली नाही. बंडखोरीचा शिक्का त्यांच्यावर लागला आहे. बंडखोरी केल्यामुळे ते भारतीय जनता पक्षात आहेत की नाही हे समजणे सुद्धा कठीण झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जवळपास दीड महिन्यापासून ते अहेरी येथे नाहीत. त्यांच्या राजमहाला समोर शुकशुकाट आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाची त्यांच्याकडे येईल का हा सुद्धा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. निवडणुकीत बंडखोरी केल्यामुळे व युतीधर्म महत्त्वाचा असल्यामुळे भारतीय जनता पक्षाने अमरीश्राव आश्रम यांच्याकडे जबाबदारी देण्याचे टाळले तर अहेरी मतदारसंघात भाजपचे नेतृत्व कोण करेल हा सुद्धा एक मोठा आणि बिकट प्रश्न जनतेसमोर निर्माण झाला आहे.
अहेरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे फार मोठे अस्तित्व नाही. भाजपच्या चिन्हावर या मतदारसंघातून यापूर्वी जिल्हा परिषदेवर मोठ्या प्रमाणात उमेदवार निवडून गेल्याचे ऐकीवात नाही. अशा परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली असताना भाजप नेमके कुणाला पुढे करेल हा सुद्धा शोधाचा विषय झाला आहे.
युती होईल काय
विधानसभा निवडणुकीदरम्यान हमखास विजय मिळवता यावा म्हणून भारतीय जनता पक्ष, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने युती केली. निकाल सकारात्मक आला. पण हीच परिस्थिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कायम राहील असे म्हणता येत नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत स्थानिक वातावरणाला प्राधान्य द्यावे लागते. स्थानिक वातावरणात भारतीय जनता पक्ष हा मोठा दावेदार पक्ष नसल्याने अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षाला युतीत सामावून घेईल असे तरी तूर्तास वाटत नाही. अहेरी विधानसभा मतदारसंघांमध्ये कोणत्या आधारावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्षाला जिल्हा परिषदेच्या जागा सोडाव्या हा मुद्दा उपस्थित होत आहे. यामुळे भाजप आणि अजित पवार गट वेगवेगळ्या चुली मांडतील अशी चर्चा स्थानिक वातावरणामध्ये आहे. मागील काही जिल्हा परिषद निवडणुकीचा अभ्यास केला असता अहेरी विधानसभा मतदारसंघांमध्ये धर्मराव बाबा आत्राम यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच नेहमी आघाडी घेतली आहे. जनतेचा कौल त्यांच्याच बाजूने जास्त आहे. जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेवर निवडले जाणारे बहुतेक पदाधिकारी अहेरी विधानसभा मतदारसंघातून जात असतात. यामुळे अहेरी विधानसभा मतदारसंघात भाजप बाजूलाच असेल असे वाटते.
0 Comments