मथुरानगर येथे भव्य कॅन्सर तपासणी शिबीर संपन्न

विभागीय संपादक // मारोती कोलावार



मथुरानगर: स्नेहादेवी राजेधर्मराव बाबा आत्राम बहुद्देशीय संस्था तसेच हर्षवर्धनरावबाबा आत्राम यांच्या पुढाकाराने राधाकृष्ण मंदिर मथुरानगर बाजारवाडी (गोमणी) ता. मुलचेरा येथे आज दि. १४ जानेवारी २०२५ रोजी भव्य कॅन्सर तपासणी शिबीर संपन्न झाले.

  या भव्य कॅन्सर तपासणी शिबिरात महत्वाची भुमिका एस.सी. जी. कॅन्सर हॉस्पिटल नागपूर यांनी दर्शविली. या शिबिरात गोमणी, मछली, गोविंदपूर, चिचेला, मभुरानगर, हरिनगर, आंबटपल्ली, कोडीगाव या गावांतील लोकांनी तपासणी करून घेतली.



    या शिबिरात एकूण १०० शिबिरार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी ६ शिबिरार्थी हे संशयीत ( सस्पेक्टेड) म्हणून गोमणी, मछली, हरिनगर, गोविंदपूर, चिचेला, मथुरानगर, आंबटपल्ली या गावातील शिबिरार्थी आढळून आले.

      कोडीगाव येथील १ शिबिरार्थी कँन्सरच्या चौथ्या स्टेजवर आणि हरिनगर येथील १ शिबिरार्थी दुसऱ्या स्टेजवर असल्याचे आढळून आले.

     या भव्य कॅन्सर तपासणी शिबिरात डॉ. मिताली हर्षबर्धनरावबाबा आत्राम,  डॉ. कमलजीत रंधे  डॉ. चंद्रिका कमल दास डॉ.दीक्षा यांनी शिबिरार्थ्यांची तपासणी करून समुपदेशन केले आणि या शिबिराच्या यशस्वीतेकारिता अमर अनाथ साना व चंद्रशेखर कमल दास यांनी मोलाचे योगदान देत कार्यक्रम शांततेत पार पाडले.

Post a Comment

0 Comments