दि.16/02/2025 ला एकल अभियान अंचल आलापल्ली संच जिमलगट्टा प्रा.आ.केद्र येथे भव्य आरोग्य व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात डॉक्टर दुर्गा जराते मॅडम , स्नेहल चौधरी मॅडम , डॉ.सुहास मेश्राम सर, सुलोचना चिनमवार ए.एन.एम. प्राथमिक आरोग्य केंद्र जिमलगट्टा व उपजिल्हा रूग्णालय अहेरी येथील रक्त पुरवठा टिम तसेच श्री. रवीजी नेलकुद्री अंचल समिती अध्यक्ष ,श्री.प्रशांत जी नामनवार ग्राम संघटन प्र. रेणुकाताई कंचकटले संभाग आरोग्य योजना प्रमुख, महेश बुरमवार अंचल अभियान प्रमुख ,संजु चौधरी प्रशिक्षण प्रमुख, दिलीप शेडमाके कार्यालय प्रमुख,संच टिम व आचार्य उपस्थित होते.
या कार्यक्रमात अहेरी परिसरात रक्ताची तुडवटा लक्षात घेऊन, रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान करून समाज सेवा करण्याचं ध्येय साधून ,एकल अभियान परिवारातील लोकांनी रक्तदान करण्याचे ठरवले. व एकूण 27 लोकांनी या शिबिरात रक्तदान केले.
तसेच 45 लोकांचे आरोग्य तपासणी करून योग्य औषधोपचार करण्यात आले.
एकल अभियान बद्दल माहिती व आरोग्य बद्दल घ्यायची काळजी याबद्दल श्री. महेश बुरमवार ,अंचल अभियान प्रमुख यांनी मार्गदर्शन केले.

0 Comments