शिवराजपुर;- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त मौजा शिवराजपुर (ता. देसाईगंज) येथे ज्ञानज्योती युवा मंडळ शिवराजपुर द्वारा विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात *प्रा. अनिल होळी* प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
प्रा. होळी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शिवाजी महाराजांच्या *पराक्रम, दूरदृष्टी, प्रशासन कौशल्य आणि युवांसाठी प्रेरणादायी शिकवणीवर सखोल प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, *"शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, तर ते कुशल प्रशासक आणि समाजहितासाठी झटणारे राज्यकर्ते होते."
युवकांना शिवरायांचे विचार अंगीकारण्याचा संदेश
प्रा. अनिल होळी यांनी युवकांना उद्देशून सांगितले की, "शिवरायांची शिकवण केवळ पुस्तकी न राहता, ती आपल्या कृतीत उतरवली पाहिजे. पराक्रम, कर्तव्यनिष्ठा, आणि आत्मसन्मान यांचा जागर प्रत्येकाने आपल्या जीवनात केला पाहिजे."
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मनीषाताई नान्हे (सदस्य ग्रामपंचायत शिवराजपुर), होते कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून प्रा. अमोल बोरकर सर, प्रा. नामदेव मस्के सर, प्रा.राजेश्वर वघारे सर, आदर्श महाविद्यालय देसाईगंज उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन प्रा. योगेश तुपट सर यांनी केले,प्रस्ताविक लोकमान्य बरडे यांनी तर आभार दिनेश बेहरे यांनी व्यक्त केले* सोबत कार्यक्रमात गावातील मान्यवर, विद्यार्थी, युवक, आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेत शिवरायांच्या विचारांना पुढे नेण्याचा संकल्प केला.
0 Comments