रेती उपलब्द करून देण्याची मागणी: तोडसा ग्रामपंचायतातील घरकुल लाभार्थ्यांची विनंती






एटापल्ली;- जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील तोडसा गट ग्रामपंचायत परिसरातील घरकुल लाभार्थ्यांना रेती पुरवठा करण्यात येण्याची मागणी करण्यात आली आहे. या परिसरात मौजा दोड्डी, दोड्डी टोला, पेठा, एकरा बु, एकरा खुर्द, झारेवाडा, कारमपल्ली, लांजी, आलेंगा, तोडसा या गावातील सुमारे 400 घरकुल लाभार्थ्यांना प्रधानमंत्री जन मन योजना व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी मंजुरी मिळाली आहे. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास रेती देण्यात येणार असताना, वन विभाग व महसूल विभाग यांच्याकडून ही प्रक्रिया अडचणीत येत आहे.


घरकुल लाभार्थ्यांची समस्या

तोडसा गट ग्रामपंचायत परिसरातील घरकुल लाभार्थ्यांना रेती पुरवठा न मिळाल्याने त्यांचे घरकुल बांधकाम पूर्ण होण्यास अडचणी येत आहेत. शासनाने घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास रेती देण्याची घोषणा केली असली तरी, वन विभाग व महसूल विभाग यांच्याकडून या कामासाठी अडथळे निर्माण होत आहेत. घरकुल लाभार्थ्यांनी या संबंधित अधिकाऱ्यांकडे विनंती केली आहे की त्यांना रेती उपलब्ध करून दिली जावी.अशी मागणी केली आहे,



Post a Comment

0 Comments