प्रतिनिधी / प्रफुल कोटांगले
चामोर्शी : दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांना योग्य मार्ग निवडता यावा , यासाठी यशोधरा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शी येथे व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .
प्राचार्य शाम रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणुन संतोषी सुत्रपवार , माजी शिक्षणाधिकारी माणिक साखरे , प्रमुख अतिथी म्हणुन राहुल लोकविकास मंडळाचे सचिव विवेक सहारे , राजु धोडरे , प्रेमानंद वालदे उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना संतोषी सुत्रपवार यांनी १० वी - १२वी नंतरचे विविध कोर्सेसची माहिती देऊन पदवी शिक्षणासाठी दर्जेदार विद्यापीठे , त्यांची पुर्वचाचणी , शिष्यवृती याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.
माजी शिक्षणाधिकारी माणिक साखरे यांनी आपल्या सेवेतीत अनुभव कथन करून विद्यार्थ्यांना समुदेशन करण्याचा सल्ला दिला.
अध्यक्षिय मार्गदर्शन करताना प्राचार्य शाम रामटेके यांनी भविष्यातील शिक्षणाची वाटचाल करताना विद्यार्थ्यांनी आपली आवड , बौध्दीक क्षमता , कौटुंबिक परिस्थिती याचा विचार करून मार्गक्रमण करण्याचा सल्ला दिला.
सदर कार्यक्रमात विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश क्षिरसागर यांनी तर आभार प्रदर्शन जयश्री कोठारे यांनी केले.
0 Comments