सर्वांगीण विकासाकरिता क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांची गरज'-प्राचार्य डॉ. विजय सोमकुंवर




अहेरी तालुका प्रतिनिधी // राहुल दोंतुलवार


अहेरी: येथील शंकरराव बेझलवार महाविद्यालयात वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन दि. 30 व 31 जानेवारी 2025 रोजी करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना व मार्गदर्शन करताना त्यांनी वरील मार्मिक उद्गार काढले.


दि. 30 जानेवारी रोजी कबड्डी, व्हॉलीबॉल व रस्सीखेच अश्या विविध खेळांचे आयोजन करण्यात आले ज्यात सुमारे 100 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच दि. 31 जानेवारी रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यात विशेष म्हणजे समूह नृत्य, एकल नृत्य, नकला, गीत गायन, वादविवाद स्पर्धा तसेच फॅशन स्पर्धा यांचे मुख्यत्वे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे शेवटी बक्षीस वितरण करण्यात आले. एकूण 35 विविध भरगच्च कार्यक्रम घेण्यात आले. ज्यात 120 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या सुप्त कला गुणाना वाव मिळावा व त्याकरिता संधी मिळावी याकरिता महाविद्यालय सदैव प्रयत्नशील असते. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्यक्रम विभाग प्रमुख डॉ. रवींद्र हजारे यांनी केले होते. या कार्यात त्यांना डॉ. सोनाली वाघ, प्रा.तनवीर शेख, प्रा.अमर सहारे व प्रा.गौरव तेलंग यांनी मदत केली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. आर.बी.घोनमोडे व प्रा. प्रतिभा जवादे यांनी संयुक्तपणे केले. स्पर्धांचे परीक्षक म्हणून प्रा. मंगला बनसोड, प्रा. अमोल शंभरकर, प्रा. घोडेस्वार,प्रा. गौरकर, प्रा. पेंदाम व डॉ. सोनाली वाघ यांनी कार्य केले. महोत्सव यशस्वी कारण्याकरिता प्रा. गजानन जंगमवार, प्रा. ज्ञानदीप आवारी, प्रा. संभाशिव लांडे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मदत केली. महोत्सव यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. अरविंद पोरेड्डीवार व सचिव श्री. प्रशांत पोटदुखे व इतर सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. महोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.

Post a Comment

0 Comments