कांदोळी;-जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खननामुळे शासनाच्या महसुलाचे मोठ्या नुकसान,पर्यावरणाची हानी आणि गुन्हेगारी वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने,त्यावर आळा घाल्यन्यासाठी जिल्ह्याधिकाऱ्यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी, स्थायी चेकपोस्ट आणि कडक उपाययोजना तातडीने अमलात आणण्याचे निर्देश यंत्रनेला दिले आहेत,परंतु या निर्देशाची अंमलबजावणी होतांना दिसत नाही, उलटे कर्मचाऱ्यांचे कंत्राटदारांसोबत साठगाठ करून अभय देण्याचे काम सुरू आहे.असाच प्रकार कांदोळी येथे सुरू आहे,
पेरमिली वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या कांदोळी येथे अवैध उत्खनन झाले असून यास सर्वस्वी जवाबदार वनरक्षक,वनपाल,वनपरिक्षेत्र अधिकारी यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे अशी तक्रार उपवनसरक्षकांना व मुख्यवनसरक्षकांना देण्यात आली आहे,सदर अशे म्हटले आहे की,गडचिरोली वनवृत कार्यालय अंतर्गत येत असलेल्या वनविभाग आलापल्ली अंतर्गत वनपरीक्षेत्र कार्यालय पेरमिली अंतर्गत कांदोळी गावाला लागून नदी पर्यंत वन जमिनीतून रस्त्याच्या दोन्ही कडेला मुरुमाचे खोदकाम करून बेकायदेशीर उत्तखंन झाले आहे तसेच सुरु आहे,
रस्त्याला लागून वन जमिनीतून शेकडो ब्रास माती मुरूम रस्त्यावर टाकले आहे कांदोळी ते नदी पर्यंत रस्त्याच्या दोन्ही कडेला खोदकाम करून खोदकाम करून उत्तखनन केलेली माती मुरुम मोठ्या प्रमाणात रस्त्यावर टाकले आहेत, असे असतांना सुद्धा वनविभागाचे कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत, वनकर्मचारी यांना फोन करून सुद्धा कारवाही करीत नाही,
मग पगार कशाचा घेतात?त्यामुळे दुर्लक्ष व उत्खनणास कंत्राटदारला अभय देणाऱ्या दोषी वनरक्षक,वनपाल वनपरीक्षेत्र अधिकारी यांना तात्काळ निलंबीत करा तसेच कंत्राटदारावर ५ पट दंड आकारून रक्कम वसुल करा अन्यथा येत्या आठ दिवसात वनवृत्त कार्यालय गडचिरोली समोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्या येईल,असा इशारा सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे यांच्या कडून देण्यात आला आहे,
(बाक्स)
या बाबी विषयी बाजू ऐकून घेण्या करिता वन परिक्षेत्र अधिकाऱ्याला दूरध्वनीद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु कॉल घेण्यात आला नाही,
0 Comments