गडचिरोली;-बिहार बुद्धगया येथिल महाबोधी महाविहार मनुवादी व्यवस्थेच्या हातातून मुक्त करून बौध्दांच्या ताब्यात देण्यात यावा या मागणीसह बुध्दगया येथे सुरू असलेल्या बौद्ध भिक्षूंच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतिने महामहिम राष्ट्पती यांना जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा यांच्या मार्फत देण्यात आले.
वंचित बहुजन आघाडी पूर्व विदर्भ कमेटीचे समन्वयक बाळू टेंभुर्णे यांच्या नेतृत्वातील शेकडोच्या संख्येत असलेल्या शिष्ठमंडळाने नुकतीच जिल्हाधिका-यांची भेट घेतली.
महामहिम राष्ट्रपती यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हिंदूचे मंदिर हिंदूंच्या, मुस्लिमांची मस्जीद मुस्लिमांच्या, ख्रिश्चनांची चर्च ख्रिश्चनांच्या ताब्यात आहे तर बौध्दांचे महाविहार बौध्दांच्या ताब्यात कां नाही? म्हणून बुध्दगया येथिल महाबोधी महाविहार १९४९ च्या व्यवस्थापन कायद्यात तत्काळ दुरुस्ती करून महाबोधी महाविराचे संपूर्ण व्यवस्थापन हे बौध्दांच्या हाती देण्यात यावे, बुध्दगया महाबोधी महाविहार येथे सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या त्वरीत मंजूर करण्यात याव्या, जगभरातील व देशातील सर्व बौध्द बांधवांच्या भावनेचा विचार व आदर करून १९४९ च्या व्यवस्थापन ऑक्टमध्ये दुरूस्ती करण्यात यावी आदि मागण्या या निवेदनात केलेल्या आहेत.
सर्व मागण्यांची पूर्तता तत्काळ करावी अन्यथा संपूर्ण बौध्द समाजाला रस्त्यावर उतरून तिव्र आंदोलन करावे लागेल असेही निवेदनात म्हटले आहे.
बाळू टेंभुर्णे यांच्या नेतृत्वात शेकडोंच्या संख्येत असलेल्या या शिष्ठमंडळात वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते जी के बारसिंगे, युवक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष कवडू दुधे, जेष्ठ नेते विलास केळझरकर, भोजूभाऊ रामटेके, शहराध्यक्ष तुळशिराम हजारे, राजू बोरकर, सिमा खोब्रागडे, नलिनी दुधे, रजनी तागडे, प्रविनय खोब्रागडे, नामदेव दुधे, तथागत बुध्द विहार इंदिरानगरचे अध्यक्ष शेशराव तुरे, तथागत बुध्द विहार नवेगांवच्या अध्यक्षा विद्या खेवले, त्रिरत्न बुध्द विहार गोकुनगरच्या लताताई भैसारे, सम्यक बुध्द विहार उपाध्यक्ष अर्चना टेंभुर्णे, प्रबुध्द बुध्द विहार विवेकानंदनगरच्या लताताई शेंद्रे, श्रावस्ती बुध्द विहार सोनापूरच्या नलिनी दुर्गे, आम्रपाली बुध्द विहार फुलेवार्डच्या प्रतिमा बोरकर, कांता भडके, नयना ढोलने, पद्मा कांबळे, बबिता ढवळे, शितल सहारे, शितल भैसारे,प्रेमिला रायपूरे, शोभा खोब्रागडे, संघमित्रा राजवाडे, दमयंती सहारे, करूणा भसारकर, कविता टेंभुर्णे, पोर्णिमा भडके, विजया धुरके, कुंदा कांबळे, जीवनधारा खोब्रागडे, राजेश्वरी सहारे, रजनीताई डोंगरे, अल्काताई बोरकर, वंदना रामटेके, किरण खोब्रागडे आदिंचा समावेश होता. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
0 Comments