भामरागड तालुका प्रतिनिधी // भीमराव वनकर
भामरागड;- दिनांक 25/02/2025 रोजी गडचिरोली पोलीस दल, पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून पोस्टे मन्नेराजाराम व सिआरपीएफ 9 बटालीयन D कंपनी मन्नेराजाराम यांच्या संयुक्त विद्यमाने मा.पोलीस अधिक्षक निलोत्पल सा. मा. यतीश देशमुख सा.(अपर पोलीस अधिक्षक अभियान) मा. एम. रमेश सा.(अपर पोलीस अधिक्षक प्रशासन) मा. श्रेणिक लोढा सा.(अपर पोलीस अधिक्षक अहेरी) यांच्या संकल्पनेतुन व मा. अमर मोहिते सा. उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन मन्नेराजाराम मार्फत दुर्गम भागातील नागरिकांना कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. सदर उपक्रम नागरीकांपर्यंत पोहचावेत व त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा करिता पोस्टे मन्नेराजाराम येथे भव्य जनजागरण मेळावा व सिव्हीक अँक्शन कार्यकमाचे आयोजन करण्यात आले.
सदर जनजागरण मेळाव्याचे अध्यक्ष मा. शंभो कुमार सा. कमांडन्ट सीआरपिएफ 9 बटालियन, प्रमुख पाहुणे श्री. सितारामजी मडावी प्रगतशील शेतकरी जिंजगाव, डॉ. डी. एस. मोहन सा. मुख्य वैद्यकीय अधिकारी (CMO) सीआरपिएफ 9 बटालियन, मा. प्रभारी अधिकारी पोउपनि नवनाथ पाटील सा. पोलीस स्टेशन मन्नेराजाराम, मा. पो. नि. टी के झो सा. सिआरपीएफ 9 बटालीयन, पोउपनि शुभम एम. शिंदे सा. पोउपनि शुभम बी. शिंदे सा. तसेच पोस्टे हद्दीतील पोलिस पाटील, गाव पाटील व गावातील प्रतीष्ठीत नागरीक यांचे उपस्थित भगवान बिरसा मुंडा व विर बाबुराव शेडमाके व डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करून भव्य जनजागरण मेळाव्याची सुरुवात करण्यात आली.
भव्य जनजागरण मेळावा व सिव्हीक अँक्शन कार्यक्रमास कमांडन्ट श्री शंभो कुमार सा. यांनी उपस्थित नागरिकांना विकासाच्या मुख्य धारेत सहभागी होण्याबाबत व पोलीसांना सम्पूर्ण सहकार्य करण्याबाबत आवाहन केले तसेच डॉ डी. एस. मोहन यांनी उपस्थित नागरिकांना आरोग्याबाबत घ्यावयाच्या काळजी संदर्भात मार्गदर्शन केले त्यानंतर प्रभारी अधिकारी पोउपनि नवनाथ पाटील सा. यांनी गडचिरोली पोलीस दल, पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध शासकिय योजनांची माहिती देऊन सदर योजनाचा लाभ घेण्याचे नागरिकांना आव्हाहन केले. तसेच पोउपनि शुभम बी शिंदे सा. यांनी नागरिकांना नविन कायद्याबाबत योग्य मार्गदर्शन करून माहिती दिली.
भव्य जनजागरण मेळावा व सिव्हीक अँक्शन प्रोग्राम करीता उपस्थित मान्यवरचे हस्ते पोस्टे हद्दीतील नागरीकांना खालील साहीत्याचे वाटप करण्यात आले
१) सायकल -08 नग
२) विळे -20 नग
३) खुरपी -20 नग
४) स्प्रे पंप -14 नग
५) कुदळ - 10 नग
6) प्लास्टिक बकेट-14 नग
7) शिलाई मशीन-5 नग
8)आंब्याचे रोपटे-100 नग
9) चिकू रोपटे-100 नग
10) फणस रोपटे-100 नग
11) संत्रा रोपटे-100 नग
12)आवळा रोपटे-100 नग
13)नाशपती रोपटे-100
नग
सदर मेळाव्याला उपस्थित नागरिकांना खालीलप्रमाणे योजनांचा लाभ देण्यात आला.
1) आभा कार्ड- 08
2) इ श्रम कार्ड-04
3) शेतकरी प्रमाणपत्र-15
4) गँस जोडणी -20
तसेच डाँ. डी. एस. मोहन सा. वैद्यकीय अधिकारी सीआरपिएफ 9 बटालियन, यांनी 100 नागरीकांची वैद्यकीय आरोग्य तपासणी करून औषधी चे वाटप करण्यात आले.
भव्य जनजागरण मेळाव्याकरिता पोस्टे मन्नेराजाराम हद्दीतील 350 ते 400 नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पोउपनि शुभम एम. शिंदे सा. यांनी केले. जनजागरण मेळाव्याला उपस्थित सर्व नागरिकांकरिता जेवणाची व्यवस्था करण्यात आली.
सदरचा भव्य जनजागरण मेळावा व सिव्हीक अँक्शन प्रोग्राम यशस्वी करण्याकरीता पोलीस स्टेशन मन्नेराजाराम येथील जिल्हा पोलीस अंमलदार, सिआरपीएफ व एसआरपीएफ चे अधिकारी/अंमलदार यांचे मोलाचे सहकार्य लाभला.

0 Comments