पेरमिली;-दिनांक 26/02/2025 रोजी गडचिरोली पोलीस दल, पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून उप पोस्टे पेरमिली व सिआरपीएफ A-09 बटालीयन - कंपनी पेरमिली यांच्या संयुक्त विद्यमाने मा.पोलीस अधिक्षक श्री .निलोत्पल सा. मा. श्री.यतीश देशमुख सा.(अपर पोलीस अधिक्षक अभियान) मा. श्री.एम. रमेश सा.(अपर पोलीस अधिक्षक प्रशासन) मा. श्री.श्रेणिक लोढा सा.(अपर पोलीस अधिक्षक अहेरी) यांच्या संकल्पनेतुन व मा. श्री.अजय कोकाटे सा. उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी यांचे मार्गदर्शनाखाली उप पोलीस स्टेशन पेरमिलीच्या वतीने दुर्गम भागातील नागरिकांना कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. सदर उपक्रम नागरीकांपर्यंत पोहचावेत व त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा करिता उप पोस्टे पेरमिली येथे *भव्य जनजागरण मेळावा व सिव्हीक अँक्शन कार्यकमाचे* *आयोजन करण्यात आले.
सदर जनजागरण मेळाव्याचे अध्यक्ष मा. N. शशीधर सा. असिस्टंट कमांडन्ट CRPF A09 बटालियन, प्रमुख पाहुणे श्री.आसिफ खाॅन पठाण पत्रकार पेरमिली, साईनाथ चंदनखेडे पत्रकार पेरमिली, डॉ. अमोल कुकुडकर वैद्यकीय अधिकारी प्रा.रुग्नालय पेरमिली तसेच पो.नि.वेद प्रकाश सा. पो.नि.नरेश कुमार सा.CRPF A09 बटालियन, मा. प्रभारी अधिकारी पोउपनि/ दिपक सोनुने सा. मपोउपनी/प्रियंका बावने मॅडम उप पो.स्टे. पेरमिली, पोलीस अमलदार प्रशांत मेश्राम, किशोर वणखेडे तसेच पोस्टे हद्दीतील पोलिस पाटील, गाव पाटील व गावातील प्रतीष्ठीत नागरीक यांचे उपस्थितीत भव्य जनजागरण मेळाव्याची सुरुवात करण्यात आली.
भव्य जनजागरण मेळावा व सिव्हीक अँक्शन कार्यक्रमास उपस्थित नागरिकांना प्रभारी अधिकारी दिपक सोनुने सा. यांनी गडचिरोली पोलीस दल, पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध शासकिय योजना व रोजगार प्रशिक्षण बाबत माहिती देऊन सदर योजनांचा लाभ घेण्याचे नागरिकांना आव्हाहन केले.तसेच तरून नागरिकांच्या कला गुणांना वाव मिळाला या करीता सदर साहित्य वाटप करण्यात येत आहे या बाबत माहिती सांगितले व नविन कायद्याबाबत योग्य मार्गदर्शन करून माहिती दिली.
भव्य जनजागरण मेळावा व सिव्हीक अँक्शन प्रोग्राम करीता उपस्थित मान्यवरांचे हस्ते पोस्टे हद्दीतील नागरीकांना खालील साहीत्याचे वाटप करण्यात आले
१) सायकल -08 नग
२) कॅरम बोर्ड-07 नग
३) व्हाॅलीबाॅल -10 नग
४) व्हाॅलीबाॅल नेट-05 नग
५) क्रिकेट बॅट- 06 नग
6) बाॅल-12 नग
7) स्टंम्प -04 सेट
8)सोलर लॅम्प -50 नग
सदर भव्य जनजागरण मेळावा व सिव्हीक अँक्शन प्रोग्राम करिता उप पोस्टे पेरमिली हद्दीतील 300 ते 350 तरुण नागरीक व ग्रामस्थ उपस्थित होते.उपस्थीत नागरिकांना अल्पोपहार व चहा पाण्याची व्यवस्था करुन सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
0 Comments