एस. बी. महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा"




अहेरी: स्थानिक श्री. शंकरराव बेझलवार कला व वाणिज्य महाविद्यालय, अहेरी येथे मराठी विभागाच्या वतीने दि. 27 फरवरी 2025 रोजी प्राचार्य डॉ. विजय सोमकुवर यांच्या मार्गदर्शनाखाली "मराठी भाषा गौरव दिन" साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. रवींद्र हजारे यांनी संस्कृत व मल्याळम या भाषेचा इतिहास सांगत भाषा म्हणजे व्यक्तीची ओळख असे मग व्यक्त करत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच मंचावरून मराठी विभाग प्रमुख प्रा. गजानन जंगमवार यांनी प्रास्ताविकेतून मराठी भाषेचा इतिहास व अभिजात दर्जा प्राप्त होण्यासाठीचे निष्कर्ष कोणते यावर भाष्य केले. यावेळेस मंचावर प्रा. प्रभाकर घोडेस्वार, प्रा. मंगला बनसोड उपस्थित होते.


या कार्यक्रमाचे औचित्य साधून मराठी विभागाद्वारे 'मराठी भाषेचे भवितव्य' या विषयावर निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत 45 ते 50 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रम सरते शेवटी मान्यवरांचे आभार प्रा. चंद्रशेखर गौरकार यांनी मानले. कार्यक्रमाला बहुसंख्येने विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी तसेच संपूर्ण प्राध्यापक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. 


या कार्यक्रमाकरीता सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूरचे अध्यक्ष श्री. अरविंद सावकार पोरेड्डीवार, सचिव श्री. प्रशांत पोटदुखे, कार्यकारी अध्यक्ष आमदार श्री. किशोरभाऊ जोरगेवार व इतर पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments