युवकांनी सैन्य भरतीच्या माध्यमातून देशाच्या सेवेस तत्पर असावे असे आवाहन ब्रिगेडियर श्रीवॉटसन के यांनी केले.
स्थानिक: श्री. शंकरराव बेझलवार कला वाणिज्य महाविद्यालयात दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी महाविद्यालयाच्या करियर मार्गदर्शन विभागाच्या वतीने सुरक्षा सेवेतील करिअरच्या संधी या विषयावर सेमिनारचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर मार्गदर्शन वर्गाचे आयोजन सैन्य भरती कार्यालय नागपूर, जिल्हा रोजगार केंद्र गडचिरोली आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले. सैन्य भरती कार्यालय नागपूर चे भरतीअधिकारी ब्रिगेडियर श्री. श्रीवाटसन के आणि सुभेदार श्री. एन. डी. क्रिस्टोफर तसेच जिल्हा कौशल्य विकास कार्यालय गडचिरोलीचे सह आयुक्त श्री. योगेंद्र शेंडे हे उपस्थित होते. सैन्यामध्ये युवकांना कोणकोणत्या विविध संधी उपलब्ध आहेत व त्यांची भरती प्रक्रिया कशी होते, त्याकरिता युवकांनी कशी तयारी करावी या सर्वांचे पद्धतशीर मार्गदर्शन ब्रिगेडियर श्रीवॉटसन यांनी पीपीटी च्या मदतीने केले.
या कार्यक्रमाचे प्रसंगी महाविद्यालयाच्या वतीने डॉ. रवींद्र हजारे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. रवींद्र हजारे यांनी तर आभार प्रदर्शन श्री. कराडे सर यांनी केले. सदर मार्गदर्शन कार्यक्रमाचा लाभ महाविद्यालयातील व परिसरातील सुमारे 150 युवक व युवतींनी घेतला. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय सोमकुवर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, सचिव,पदाअधिकारी व सदस्य यांनी अभिनंदन केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.
0 Comments