प्रतिनिधी :-अनिल कांबळे. ,
उन्हाळी धानाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने शेतकऱ्यावर हल्ला केला.शेतकरी आणि वाघात झालेल्या लढाईत अखेर वाघाने हार मानून पळून गेला.वाघाने केलेल्या हल्ल्यात गोवर्धन डांगे वय ५३ राह.नांदगाव असे जखमी शेतकऱ्यांचे नाव आहे.
ब्रम्हपुरी तालुक्यातील नांदगाव येथील शेतकरी गोवर्धन डांगे वय ५३ यांच्या शेतात उन्हाळी धानाची लागवड केली आहे नेहमी प्रमाणे गावापासून एक ते दीड किमी अंतरावरील स्वतःच्या शेतावर धानाला पाणी देण्यासाठी आज सकाळी ७.३० गेले असता.शेतात दबा धरुन बसलेल्या पट्टेदार वाघाने शेतकरी गोवर्धन डांगे याचेवर अचानक हल्ला केला. वाघ व शेतकरी आमने सामने येताच वाघाने गोवर्धन डांगे या शेतकऱ्यावर हल्ला केला.वाघाने गोवर्धन डांगे यचेवर हल्ला केला गोवर्धन याचे चेहऱ्यावर पंजे मारले चेहरा रक्त बंबाळ केलेजे.मात्र गोवर्धन न घाबरता मोठ्या हीमतीने हातातील मोबाईल खिशात ठेवला.वाघाने पुन्हा हल्ला करताच गोवर्धन यांनी वाघाचे दोन्ही हात मोठ्या ताकतीने पकडले. व त्यास जमिनीवर आदळले . शेतकरी गोवर्धन डांगे व वाघात झुंज झाली.त्यात वाघ घाबरून तिथून पळून दुसऱ्याच्या शेतात गेला.आदीच सावध असलेला गोवर्धन यास पुन्हा आपल्यावर वाघ हल्ला करू शकतो म्हणून लगत असलेल्या अभिमान बांडे यांच्या शेतातील गट नंबर ४२० शेतातील विहिरीत उतरून जवळच्या मोबाईलने मुलाला घटनेची माहिती दिली.लगेच मुलगा धम्मदिप डांगे शेतावर येऊन जखमी वडीलाला ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी यांनी रुग्णालयात येऊन भेट घेतली व पंचानाला करणार असे बोलले.पोलीस ग्रामीण रुग्णालयात दाखल होऊन पंचनामा केला. सध्या गोवर्धन डांगे यांनी प्रकृती ठीक आहे.नशीब बलवंत म्हणून गोवर्धन डांगे यांच्या चेहऱ्यावर व हातावर वाघाच्या ओरखड ल्याच्या जखमा आहेत. नांदगावतील शेत शिवारात वाघाचा मोठ्या प्रमाणात वावर असून त्याचा बंदोबस्त तत्काळ करावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
0 Comments