गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आदिवासी अध्यासन केंद्र व पदव्युत्तर शैक्षणिक इंग्रजी विभाग व श्री. शंकरराव बेझलवार कला व वाणिज्य महाविद्यालय अहेरी येथील इंग्रजी व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी कार्यशाळेचे आयोजन दिनांक 18 मार्च 2025 रोजी अहेरी येथे करण्यात आले. या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी उद्घाटक व अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय सोमकुंवर हे उपस्थित होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून डॉ. नरेश मडावी, सहा प्राध्यापक, इतिहास विभाग, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, डॉ. वैभव मसराम, समन्वयक, आदिवासी अध्यासन केंद्र, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, तसेच डॉ. रवींद्र हजारे, कार्यक्रमाचे आयोजक म्हणून तर प्रा. अतुल गावसकर, सहा प्राध्यापक, प्रमुख पाहुणे म्हणून, प्रा. जी. डी. जंगमवार आदिवासी लोक कथांचे अभ्यासक म्हणून मंचावर उपस्थित होते.
या कार्यशाळेकरिता महाविद्यालयातील आदिवासी तसेच इतर सर्व विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आणि उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांकडून अनेक साहित्य कृती तयार करून घेण्यात आल्या व तीन उत्कृष्ट साहित्याची निवड करून त्यांना पारितोषिक देण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांना 'आदिवासी भाषा- उगम आणि सद्यस्थिती' याविषयी डॉ. रवींद्र हजारे यांनी मार्गदर्शन केले तर प्रा. जंगमवार यांनी आदिवासी लोककला यांचे वैशिष्ट्य प्रतिपादन केले. डॉ. नरेश मडावी यांनी आदिवासी इतिहास कसा गोळा करावा व त्याचे दस्तऐवजीकरण कसे करावे याविषयी यथोचित मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या साहित्य कृतींचे सादरीकरण दुसऱ्या सत्रात करण्यात आले व सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना आणि लेखकांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. सोमकुंवर सर यांनी आदिवासी संस्कृती, कला साहित्य व इतिहास हा मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरिता रचनात्मक प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे आणि त्याकरिता दरवर्षी कार्यशाळेचे आयोजन केले पाहिजे आणि आदिवासी साहित्य व संस्कृतीचे जतन केले पाहिजे, असे वक्तव्य अध्यक्षीय भाषणातून केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. नामदेव पेंदाम तर आभार प्रदर्शन डॉ. रूपा घोनमोडे यांनी केले. कार्यक्रम उत्कृष्टपणे पार पाडण्याकरिता डॉ. सोनाली वाघ तसेच इतर सर्व प्राध्यापक वृंद आणि स्वंयसेवक विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले. आदिवासी समाजामध्ये होऊन गेलेले राजे व त्यांच्या कार्याची माहिती सांगणारा माहितीपट प्रा. गौरव तेलंग यांनी तयार केला व त्याचे पडद्यावर प्रसारण करण्यात आले. कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. अरविंद पोरेड्डीवर, सचिव श्री. प्रशांत पोटदुखे तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. कार्यशाळेकरिता 55 विद्यार्थी व 10 शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. अशा कार्यशाळेमुळे आदिवासी युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
0 Comments